जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जराड यांची माहिती

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!

आधुनिक केसरी न्यूज

शांताराम मगर 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुका पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पुर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाँ.अरुण जराड यांनी दिली.निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करण्यात आले असून मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता येईल, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता प्रभावी झाली असुन त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.आचारसंहितेच्या उल्लंघनावर तात्काळ कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.मतदान व मतमोजणी या सर्व टप्प्यांसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट यंत्रांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.मतदान कर्मचारी,अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध राहील,याची दक्षता घेतली आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू करण्यात आला असून तक्रारींसाठी हेल्पलाईन उपलब्ध असेल,असेही अरुण जराड यांनी सांगितले.निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, बेकायदेशीर साहित्य वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाईल. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या मजकुरावरही कारवाई केली जाणार आहे. निवडणुक प्रक्रिया पारदर्शक,निष्पक्ष व लोकशाही मुल्यांना धरून पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी आरुण जराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सुचना दिल्या.सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओग्राफी याचं नियमितपणे निरिक्षण काटेकोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार,हलगर्जीपणा किंवा तक्रार उद्भवू नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले़
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा आहे.नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे व नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जराड यांनी शेवटी केले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी तहसीलदार सुनिल सांवत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

वैजापुर पंचायत समीती जिल्हा परीषद निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह आणि शांततेत पार पडेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी ना तहसीलदार सुरज कमावत काकडे साहेब,भागवत बीघोत.एस जी रावते.ज्ञानोबा जायभाये, हेमंत ऊशिर मनिष दिवेकर,प्रदिप दुशिंग विष्णु बिरेवाड,शेख सर.प्रविण गायकवाड,नामदेव वसाळे,आमोल निखडे,नितीन महापुरे छायाचित्रकार शांताराम मगर यांच्यासह क्षेञीय आधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.

एकुण मदान केंद्रे 281
निवडणूक गट. 8 गण 16
एकुन मतदार 223947
पुरुष मतदार 116943
महिला मतदार 107004
दिव्यांग मतदार 1052

फोटो कंँप्शन 
निवडणूक निर्णय आधिकारी डांँ आरण जराड EVM वाटपावेळी मार्गदर्शन करतांना
छायाचित्र शांताराम मगर

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!
आधुनिक केसरी न्यूज शांताराम मगर  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुका पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन...
चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल