दुचाकी वाहन जळून खाक; मार्डा रोडवर कुणबी भवनजवळील घटना

दुचाकी वाहन जळून खाक; मार्डा रोडवर कुणबी भवनजवळील घटना

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा :  तालुक्यातील मार्डा रोडवर कुणबी भवनच्या बाजूने जाणाऱ्या नवीन हायवेजवळ एक भीषण अपघात घडला. वडगाव येथील रहिवासी प्रमोद पिंपळशेंडे यांच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. ही घटना आज दुपारी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळशेंडे आपल्या दुचाकीने मार्डा रोडवरून जात असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात दुचाकीला आग लागली. आग एवढी भयानक होती की, चालकाला वाहन थांबवून जीव मुठीत धरून बाजूला पळावे लागले. वाहन विझवण्याचा कोणताही प्रयत्न करण्याआधीच आगीने रौद्र रूप धारण केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी १ ठार, १७ प्रवासी जखमी भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी १ ठार, १७ प्रवासी जखमी
आधुनिक केसरी न्यूज वरोडा : भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळ आज (15 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका...
दुचाकी वाहन जळून खाक; मार्डा रोडवर कुणबी भवनजवळील घटना
एसीबीच्या जाळ्यात फसला सहायक महसूल अधिकारी 
भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही
वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली 
चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 
चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी