महापुरुषाची विटंबना ; पोलिसांची तत्परता अवघ्या काही तासात जळगाव पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : 14 फेब्रुवारी च्या रात्री महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजतात जळगाव जामोद पोलिसांनी सी.सी. फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे शहरातीलच पाटील नगरात राहणाऱ्या राहुल विश्राम लांडे वय( ४० वर्ष) नावाच्या इसमास ताब्यात घेऊन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या कलम २९९,२९१ आणि १९६(१)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असूनआरोपीस जेरबंद करण्यात आले.
महापुरुषाची विटंबना झाल्याचे समजतात जळगाव शहरातील मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला. महापुरुषाची विटंबना करणाऱ्या आरोपीस आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमच्या परीने त्याला धडा शिकवू. एकंदरीत आंबेडकरी समाज पेटून उठला होता. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव जामोद चे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी महाजन साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर जाऊन पुष्पहार अर्पण केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात एकत्र झालेल्या आंबेडकरी अनुयायास ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की, ज्या विकृत मानसिकतेच्या आणि समाजात जातीयतेचे विष पेरणाऱ्या या समाजकंटकास आम्ही ताब्यात घेतले असून आम्ही आरोपीस विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महापुरुषाची अशाप्रकारे विटंबना करणाऱ्या या नराधमास कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही त्याला कशी शिक्षा केल्या जाईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. शहरातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी आम्हाला सहकार्य करावे. यावेळी उपविभागीय अधिकारी महाजन साहेबांनी सुद्धा आंबेडकरी अनुयायांनी कुठल्याही अफवांवर विकास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले.
घटनेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकत होता त्यासाठी जळगाव जामोद शहरातील आंबेडकरी चळवळीसठी तन मन धन अर्पण करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पारवे यांनी सर्व समाजाला शांततेचे आवाहन केले. आपण शाहू,फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत. संविधानिक व शांततेचा मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. सर्व समाज बांधवांकडून शांततेचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी तामगाव,सोनाळा, नांदुरा येथील पोलीस पथकांना पाचारण करण्यात आले होते.भिम अनुयायी, विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शांततेचे आवाहन करण्यात आले होते. शहरवासीयांच्या मागणीनुसार मुख्य स्मारकाच्या भोवती तात्काळ सी.सी.टी.व्ही बसविण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून जळगाव जामोद शहरात त्यानिमित्त सर्व व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एकंदरीत सर्व शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List