अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!

अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाच्य लढाईत सबंध महाराष्ट्रात गाजलेली चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक आता महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा धानोरकर वडेट्टीवार गटामध्ये प्रचंड रस्सीखेच झाली. वाद दिल्ली दरबारी पोहोचला. हाय कमांडने अखेर यात समेट घालविण्याचा प्रयत्न केला आणि महापौर पद धानोरकर गटाकडे तर गटनेता आणि उपमहापौर पद हे वडेट्टीवार गटाकडे देण्याचा समझोता करण्यात आला.  असे असले तरी महापौर पदाच्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी मात्र वडेट्टीवार गटाकडे देण्यात आलेल्या उपमहापौर पदासाठी धानोरकर गटातर्फे राहुल चौधरी यांनीही उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. हाय कमांडर ने दिलेल्या सूचनेनुसार वडेट्टीवार गटाला उपमहापौर पद देण्यात आले असून त्यासाठी वसंता देशमुख यांचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

 निवडणूक झाल्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून येत काँग्रेस हा महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेसाठी प्रमुख दावेदार असणारा पक्ष होता. परंतु निवडणुकीनंतर लगेच धानोरकर आणि वडेट्टीवार या दोघांनीही श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपापल्या नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठविले होते. या संधीचा फायदा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांच्या बळावर गट नोंदणी केलेली होती. तांत्रिकदृष्ट्या वादात अडकलेल्या या गट नोंदणीला वडेट्टीवार गटातर्फे आव्हान देण्यात आले होते. अखेर आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी एकत्र येत  काँग्रेस पक्षाचे अधिकृत गटनेते राजेश अडुर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा अधिकृत गट  नागपूर विभागीय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेला आहे.
काँग्रेसच्या या गट नोंदणीमुळे दहा तारखेला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मॅजिक फिगर ३४ मिळविण्यासाठी उबाठा गटाचे सहकार्य नेमके कोणाला मिळेल ? यावर चंद्रपूरचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल ते ठरणार आहे. तर धानोरकर गटाचे राहुल चौधरी उपमहापौर पदासाठी दाखल केलेले नामांकन अर्ज वेळेवर मागे घेतील का की वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि अहंकाराच्या लढाईमध्ये धानोरकर वडेट्टीवार वादाचा लाभ भाजपाला मिळेल ? या प्रश्नांची उत्तरे आता १० तारखेला मिळणार आहेत. 
तूर्तास काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी एकत्र येत अधिकृत गटनेत्याच्या माध्यमातून गटनोंदणी केलेली असल्यामुळे सध्या तरी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक