अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना

अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना

आधुनिक केसरी न्यूज

गडचिरोली : दि. ६ अबुजमाड जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना आज गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली.

पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय रिझर्व पुलिस बल  उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

नक्षलविरोधी कारवाईदरम्यान कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले दीपक मडावी यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कधीही विसरले जाणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रशासन आणि पोलीस दल त्यांच्या पाठीशी उभे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.मानवंदना कार्यक्रमानंतर शहीद दीपक चिन्ना मडावी यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी अहेरी तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी दामरंचा येथे रवाना करण्यात आले. मार्गक्रमणादरम्यानही पोलीस दलाच्या वतीने सन्मान राखण्यात आला.

नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण
अबुजमाड जंगल परिसरात काल माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भामरागड येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांनी वीरमरण पत्करले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक