चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन

चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, संवेदनशील समाजसेवक, दूरदृष्टी असलेले पर्यावरणप्रेमी आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारे डॉ. गोपाल मुंधडा यांचे दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. डॉ. मुंधडा हे केवळ एक नामवंत बालरोगतज्ञ नव्हते, तर सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत प्रतीक होते. गेली जवळपास ४८ वर्षे त्यांनी वैद्यकीय सेवा, समाजकार्य, पर्यावरण संरक्षण, महिला व बालकल्याण, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि जनजागृती या प्रत्येक क्षेत्रात अथक व नि:स्वार्थ योगदान दिले.
चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागात त्यांनी असंख्य मोफत वैद्यकीय शिबिरे, बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया शिबिरे, मानसिक मंदत्व, सेरेब्रल पाल्सी, सिकलसेल, थॅलेसेमिया, मधुमेह, महिलांचे आरोग्य, रक्तदान, नेत्रतपासणी अशा उपक्रमांद्वारे हजारो गरजूंच्या जीवनात आशेचा प्रकाश पेरला.
“गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचली पाहिजे” हाच त्यांचा जीवनमंत्र होता.“Fit Children – Fit Bharat”, “Save the Girl Child”, “Beti Bachao Beti Padhao”, “Aarogya Sewak”, “Ek Ped Maa Ke Naam”, “Vruksha Dattak Yojana” यांसारख्या दूरगामी उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाज यांना एकत्र आणून आरोग्य व सामाजिक जाणीवेचे बीज रुजवले.

प्रदूषणग्रस्त चंद्रपुर शहरासाठी त्यांनी उभारलेला लढा, स्वच्छता चळवळी, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती आणि शहरहितासाठी केलेले आंदोलन हे त्यांच्या धाडसी नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.
IMA, IAP, CBSS, Rotary, Lions, JCI, Aarogya Bharti, Ekal Vidyalaya यांसारख्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत समाजसेवेचे आदर्श निर्माण केले. असंख्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला असला, तरी लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच त्यांचे खरे पारितोषिक होते.
आज समाजाने एक मार्गदर्शक, एक आधारवड, एक सेवाव्रती व्यक्तिमत्त्व गमावले आहे.डॉ. गोपाल मुंधडा यांचे कार्य, विचार आणि मूल्ये पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, संवेदनशील समाजसेवक, दूरदृष्टी असलेले पर्यावरणप्रेमी आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारे डॉ. गोपाल मुंधडा...
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन