लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

आधुनिक केसरी न्यूज

जनार्दन चव्हाण

निफाड : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आला आहे.खंडु संपत गव्हाणे (वय २८, आर.सी.एफ. फोर्स सिक्युरिटी गार्ड, शाखा अहमदनगर, सध्या रा.देवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. विलास निवृत्ती भालेराव (रा.पिप्री, ता.येवला), ममता किरण पगारे (रा.ब्रिजलाल नगर, कोपरगाव) आणि चांदणी मोहन कदम (रा.गांधीनगर, कोपरगाव) या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस “आम्ही तुझे लग्न चांदणी हिच्याशी लावून देतो” असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर आरोपींनी खोटी नोटरी तयार करून आरोपी चांदणी हिला फिर्यादीसोबत देवगाव येथे पाठवले व लग्न झाल्याचा बनाव केला. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही कायदेशीर लग्न न होता फिर्यादीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स.पो.नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक