चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

आधुनिक केसरी न्यूज

नागपूर : दि.2 चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तोडगा निघेल अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. पण काही घटनांमुळे निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार असून याबाबत पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोडला असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती? अस टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली.यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना NDA बरोबर राहण्याची अपरिहार्यता आहे. त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. अशा वेळी शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही यातूनच विधान केली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.अजित पवार यांच्या मृत्यूबाबत देखील विविध शंका उपस्थित केल्या जात असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक