गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : (गो. वि.) दिनांक 1/02/26विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच संबंधितांना सूचित करण्यात येते की, हिवाळी २०२४ व उन्हाळी २०२५ परीक्षेमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये (Degree Certificate) मराठी भाषेमध्ये नाव समाविष्ट करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाने Student Profile मध्ये विद्यार्थ्याचे मराठीत संपूर्ण नाव जसे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव व आडनाव नमूद करणे अपेक्षित आहे, परंतु काही महाविद्यालयांनी Student Profile मध्ये नमूद केलेले नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात अडचण येत आहे.
सदर विद्यार्थ्यांचे मराठी भाषेमधील संपूर्ण नाव Students Profile मध्ये नमूद केलेले नाही. अशा विद्यार्थ्यांची नावे WhatsApp Group (सर्व महाविद्यालयाचे कर्मचारी यांचे) तसेच महाविद्यालयाचे Email ID वर पाठविलेले आहेत.
याअनुषंगाने महाविद्यालयाने सदर विद्यार्थ्यांचे नाव Students Profile मध्ये तसेच विद्यार्थ्यांची नावांची यादी Excel Sheet मध्ये एम. के. सी. एल. कंपनीच्या Email ID वर दिनांक ०4/०2/2026 पर्यंत पाठवावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण होऊन महाविद्यालयांना वेळेत पदवी प्रमाणपत्र वितरित करता येईल.
करीता संबंधित महाविद्यालयाने याबाबत कार्यवाही घ्यावी.
असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List