अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू भोकर-नांदेड रस्त्यावरील घटणा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू भोकर-नांदेड रस्त्यावरील घटणा

आधुनिक केसरी न्यूज

भोकर : सध्या सर्वत्र बिबट्याचा वावर होत असल्याने नागरिकांत भिंतीचे वातावरण असताना तालुक्यातील भोसी परिसरात शनिवारी (ता.तीन) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रविवारी (ता. चार)वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
#वनविभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर असल्याचे पशुगननेतुन स्पष्ट झाले आहे.शिकार आणि पाण्याच्या शोधात त्यांची  सतत भटकंती असते,जनावरे व कुत्र्यावर अनेकदा हल्ला झाल्याचे दिसून आले आहे पण नागरीकावर अद्याप बिबट्यानी हल्ला केल्याची नोंद नाही.तालुक्यातील रिठ्ठा, पांडूरणा,भोसी,सिताखांडी,किनी, परिसरात अधिक वावर असल्याचे समजते.वनविभागाने उन्हाळ्यात जंगली प्राण्यांसाठी बहूसंख्य ठिकाणी पानवटे तयार केले आहेत तर काही भागात नैसर्गिक तलाव असल्याने जंगली प्राणी आपली तहान त्यावर भागवतात. घनदाट झाडी नसल्याने शिकारीसाठी गैरसोय होत आहे परिणामी कित्येकदा जंगली प्राणी आपला मोर्चा  मानवी वस्तीकडे  वळवील्याचे दिसून आले आहे. यापूर्वी चक्क हरीण शहरातील एका भांडीदूकानात घुसून आसरा घेतल्याची घटना घडली होती.जखमी झाल्याने वनविभागाने त्यास ताब्यात घेवून उपचार केले पण त्याचा मुत्यु झाला.सध्या मागील महिनाभरापासुन राज्यात बिबट्याचा वावर अधिक प्रमाणात वाढल्याने नागरिक व शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालूक्यात बिबट्यानी जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान शनिवारी रात्रीच्या वेळी एक बिबट्या शिकारीच्या शोधात भटकंती करीत असताना भोसी (ता. भोकर) परिसरात डांबरी रस्ता ओलांडताना  मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रविवारी ता‌. (चार) वनविभागास माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाणे,वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती श्री.खटाणे यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!