वरोडा नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता अर्चना ठाकरे २७८५मतांनी विजयी..!
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : दरोडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसच्या अर्चना आशिष ठाकरे यांनी भाजपच्या माया रमेश राजूरकर यांचा २७८५ मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत अर्चना ठाकरे यांना 11396 तर भाजपच्या माया रमेश राजुरकर यांना 8611 मते मिळाली.
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही प्रभागांत भाजप व काँग्रेस यांच्या अटीतटीचा सामना झाला. नगरपरिषदेतील 26 नगरसेवकांपैकी भाजप 11 तर काँग्रेस 10 जागांवर विजयी झाली. शिवसेना शिंदे गटाने दोन जागा तर राष्ट्रवादी अजित पवार व उबाठा गटाने प्रत्येकी एक जागा पटकावली. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. शहरातील प्रभाग एक अ गटातून भाजपच्या नलिनी आत्राम यांनी काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम यांचा 222 मतांनी पराभव केला तर ब गटातून काँग्रेसच्या राहुल देवडे यांनी भाजपच्या बंडु लभाने यांना 86 मतांनी पराभूत केले. प्रभाग दोन अ मधून काँग्रेसचे बंडू देऊळकर यांनी शिंदे गटाच्या जगदीश पंधरे यांचा 103 मतांनी पराभव केला. दोन ब गटातून भाजपच्या वर्षा पिसाळ या विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या मीनाक्षी कुंकुले यांचा 21 मतांनी पराभव केला. तर प्रभाग तीन अ मधून भाजपच्या लिना गयनेवार यांनी काँग्रेसच्या त्रिशला टेंबरे 184 मतांनी पराभव केला. प्रभाग तीन ब गटातून भाजपचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी काँग्रेसचे प्रदीप दांदडे यांच्यावर विजय मिळवला.पवार यांना 403 तर दांदडे यांना 304 मते मिळाली.
प्रभाग चार अ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगिता नेरकर या विजयी झाल्या.त्यांनी काँग्रेसच्या नीता कष्टी यांचा 88 मतांनी पराभव केला. चार ब गटातून उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते मनीष जेठाणी यांनी भाजपचे विठ्ठल टाले यांचा 37 मतांनी पराभव केला.
प्रभाग पाच मधून रोशनी भडके यांनी भाजपच्या ममता मरस्कुल्ले यांच्यावर १३९मतांनी विजय मिळवला तर पाच ब मध्ये अपक्ष उमेदवार गजानन जीवतोडे हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख जेरुद्दीन शेख मोहितदिन यांचा 116 मतांनी पराभव केला.
प्रभाग सहा अ मध्ये भाजपचे अक्षय भिवदरे तर सहा ब मध्ये भाजपच्याच आशा आसेकर या विजयी झाल्या. प्रभाग सात अ मध्ये काँग्रेसच्या रेखा तेलतुंबडे तर ब मध्ये काँग्रेसचेच राजकुमार खंडारे विजयी झाले. प्रभाग 8अ मधून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम तर आठ ब मधून भाजपच्या मनीषा दानव या विजयी झाल्या.
प्रभाग नऊ अ मधून काँग्रेसच्या मंगला पिंपळकर तर 9 ब मधून काँग्रेसचेच माजी नगरउपाध्यक्ष अनिल झोटिंग यांनी विजय मिळवला. 10 अ मधून भाजपच्या सीमा तडस तर दहा ब मधून शिंदे सेनेचे कुणाल रूयारकर यांनी बाजी मारली. प्रभाग 11 अ मधून काँग्रेसच्या सुषमा चांभारे तर ब मधून काँग्रेसचे अभय ठावरी यांनी विजय मिळवला. प्रभाग 12 अ मधून शिंदे सेनेचे खेमराज कुरेकार तर १२ ब मधून भाजपच्या लता हिवरकर या विजयी झाल्या. प्रभाग तेरा अ मधून भाजपचे प्रवीण चिमूरकर तर 13 ब मधून भाजपच्याच नुपूर तेला यांनी विजय मिळवला. चिमूरकर हे नगरसेवकामध्ये सर्वात जास्त मत घेणारे ठरले आहेत.
*मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला नाकारले!*
या निकालानंतर शहरात विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात वाजत गाजत मिरवणूक काढल्या. भाजपने आपल्या निवडणूक प्रचारात शहराचा सर्वांगीण विकास हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्यासाठी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेत केंद्र व राज्य यांच्या सर्व योजनांचा लाभ घेत विकास शहराचा विकास करण्याचे व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते.मात्र मतदारांनी शहराच्या विकासाकडे पाठ फिरवत मतदान केले. आता मात्र नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकां समोर आता शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे.
नगराध्यक्षांना करावी लागणार कसरत.
वरुडा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या असल्या तरी नगर परिषदेतील 26 नगरसेवकांपैकी केवळ दहाच जागी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे कोणतेही काम करत असताना त्यांना बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असे दिसते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List