महाराष्ट्र ट्रेड फेअर" प्रदर्शनात "पंचम दा" च्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : दि. २० मिलिंद ओक दिग्दर्शीत आर डी बर्मन यांच्या संगीतावर आधारित "पंचम दा" या सांगितीक गीत गायन आणि नृत्यविष्काराचा संगम असलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने "महाराष्ट्र ट्रेड फेअर" प्रदर्शनात शनिवारी (दि. २०) रंगत आणली. भारतीय सिनेसृष्टीचे प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या आठवणीना उजाळा देत कलाकारांनी त्यांनी संगीतबद्ध केल्या विविध जुन्या नव्या गीतांवर नृत्य सादर करत लक्षवेधक नृत्य सादर केले.
यावेळी माहेश्वरी सभेच्या तथा कार्यक्रम समन्वयक रेखा राठी यांचा माहेश्वरी सभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि सन्मान केला. ओ हसीना जुल्फो वाली.... मेरे नैना सावन भादो....हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जाणते... क्या यही प्यार है....मेरी भिगी भिगी सी....अशा आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या अविस्मरणीय गीतांना गायक तथा सारेगामा फेम जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, अभिलाषा चेल्लम, मालविका दीक्षित यांनी स्वर बद्ध करत विविध जुन्या नव्या गीतांवर अभिषेक अवस्थी रिया देसाई, हितेन आहेर, ऋतुजा इंगळे यांनी बहारदार नृत्य सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला.
यावेळी सचिव सत्यनारायण सारडा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्यामसुंदर सोमाणी, सचिव अजित नावंदर, जालना जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष दामोधर बजाज, सचिव दिलीप चंचानी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ नागरिक संस्था अध्यक्ष भिकमचंद मल, सचिव मदनलाल जाजू यांची उपस्थिती होती. सामाजिक भावनेतून समाजातील युवक-युवतींच्या स्वावलंबासाठी आणि महिला सक्षमीकरणा सह नवे उद्योजक घडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन,छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, जालना जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने आर आर केबल प्रस्तुत भव्य महाराष्ट्र ट्रेड फेअर २०२५ चे आयोजन सेव्हन हिल येथील एएफएस शाळेच्या मैदानावर १९ ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
उद्योजक, तज्ञांनी केले मार्गदर्शन.
असराणा सोलुशन, मुंबई चे अध्यक्ष सुदेश देसाई, यांनी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन केले. Mofe चे संचालक संदीप कोटे, म्हणाले की, अन्न प्रक्रियेत मोठ्या संधी आहेत. तरुणांनी याकडे प्रधान्याने लक्ष दिले पाहिजे. जगातील बाजारपेठेत अन्न प्रक्रियेला मोठी मागणी आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासनाचेही मोठे सहकार्य तुमच्या व्यवसायाला मिळू शकते. एबी चांडक अँड असोसिएट चे संचालक तथा सीए अनुज चांडक म्हणाले की, केंद्र व राज्यशासन व्यसयासाठी कर्ज उपलब्ध करून देत असते. प्रत्येक योजना वेगवेगळ्या असल्या तरी शासन त्याला आवश्यक ती सबसिडी देते. पंतप्रधान किसान संपदा योजने च्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकते. शासनाच्या मदतीने अन्न प्रक्रियेत मोठे व्यवसाय आपण सुरु करू शकतो. त्यासाठी युवकांनी आणि लहान ग्रहउद्योग करणाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनाचा फायदा घ्यायला पाहिजे
हेमंत राठी, अध्यक्ष एम्पयर स्पाईसेस लि.
वेळेचे नियोजन करा
जरा मोठा विचार करा. व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला उद्योगात आर्थिक शिस्त असणे आवश्यक आहे. वेळेचे बंधन पाळा, जोपर्यंत तुम्ही वेळ नाही पाळणार तोपर्यत तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळणार नाही. वेळेचे ब्यवस्थापन करा कारण गेलेली वेळ कधीच वापस नाही येणार. आपल्या कामात पारदर्शकता असावी. कुटुंब प्रथम व्यवसाय द्वितीय आणि स्वतः नंतर ही त्रिसूत्री वापरा.
आज प्रदर्शनात
आज रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता “लीडरशिप अँड ग्रोथ मास्टरक्लास” या विषयावर प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर हर्षवर्धन जैन, तर डॉ. जगत शाह हे “इम्पोर्ट एक्स्पोर्ट” या विषयावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान २०, २१ डिसेंबर रोजी कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List