कोकाटे साहेबांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी मनोज कायदे यांच्याकडे सोपवा; विदर्भासाठी राष्ट्रवादीची ठाम मागणी”
आधुनिक केसरी न्यूज
बाळासाहेब भोसले
सिदखेडराजा.मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार मनोज देवानंद कायदे यांना रिक्त मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, विदर्भातील नेतृत्व बळकट करण्याची ही संधी असून, मनोज कायदे यांना मंत्रिपद देणे ही काळाची गरज असल्याचे मत सिद्धार्थ जाधव यांनी मांडले.यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आणि निवेदन सादर करून ही मागणी पुढे रेटली आहे.
यामागील कारणे पुढीलप्रमाणे : विदर्भाचा विकास साधण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज पश्चिम विदर्भातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख निर्णयांना गतीपक्षाची पकड आणि जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रिपदाची गरजकोकाटेंच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत, विदर्भाला प्रतिनिधित्व देत मनोज कायदे यांच्याकडे मंत्रिपद सोपवण्यात यावे अशी ठाम व आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List