वनिष घोसले यांना सरपंच पदावरून काढण्याचा अमरावती आयुक्तांचा आदेश
आधुनिक केसरी न्यूज
राजीव आगरकर
करंजी : पळसकुंड उमरविहीर ग्रामपंचायतचे सरपंच वनिष घोसले यांना दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सरपंच पदावरून काढण्याचा आदेश अपर आयुक्त, अमरावती यांनी पारित केल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. सुभाष शिंदे उपसरपंच, यांनी भ्रष्टाचार व गैरवर्तन बाबत ग्रामपंचायत अधिनियम, 1959 च्या अंतर्गत आयुक्त यांच्या कडे अर्ज सादर केला होता. त्या नंतर अर्जावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कडून चौकशी करण्यात आली. सदर चौकशी मध्ये बोगस ग्रामसभा व बेकायदेशीर ठराव पास केल्याचे निष्पन्न झाले. या चौकशी दरम्यान सरपंच वनिष घोसले यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याचे समोर आले. या चौकशी अहवाल नंतर अपर आयुक्त अमरावती यांच्या पुढे सुनावणी व युक्तिवाद झाल्या नंतर प्रकरण आदेशसाठी ठेवण्यात आले. सदर प्रकरणात सरपंचाने जवळपास अठरा ते वीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. पळसकुंड ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत असल्याने प्रचंड निधीचा ओघ आहे. म्हणूनच गरीब व अशिक्षीत आदिवासी बांधवांची पिळवणूक केल्याच्या अनेक तक्रारी सुद्धा वनिष घोसले यांच्या विरोधात आहे. सरपंचाने आपले काळे कारनामे लपविण्यासाठी भाजप मध्ये सुद्धा प्रवेश घेतला आहे. आज रोजी या सरपंचाची राळेगाव तालुक्यात गरीब गावचा श्रीमंत म्हणून असलेली प्रतिमा अनेकांना प्रभावित करत असल्याने पक्षात सुद्धा मान सन्मान मिळत आहे. अपर आयुक्त अमरावती यांनी दिलेल्या आदेशामुळे गावक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भ्रष्टाचारी सरपंच याला पदावरून दूर केल्याने निर्णयाचे स्वागत केले जात आहे. अर्जदार यांच्या वतीने अॅड वैभव पंडित , अॅड मंगेश शेंडे, अॅड निखिल लोंढे यांनी बाजू मांडली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List