किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे 

किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मंगळवारी (ता.2) होणारी निवडणूक मुक्त आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्याकरिता निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून  मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन निर्भिडपणे आपला मताचा हक्क बजावावा असे आवाहन तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले.
  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेल्या रूपरेषेनुसार सर्व प्रक्रिया होऊन आता मंगळवारी (ता.2) किनवट नगर परिषेकरिता मतदान घेतले जाणार आहे. किनवट नगर परिषदेत 10 प्रभाग असून याद्वारे 21 सदस्य व नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी 8 व सदस्य पदासाठी 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण मतदार : 25593 असून यापैकी पुरुष मतदार :12334 , स्त्री मतदार :13256 व  ईतर मतदार :03 आहेत. शहरात एकूण मतदान केंद्र : 29 आहेत. यापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. 10 क्षेत्रिय अधिकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत यापैकी 5 राखीव आहेत. 146 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले असून  यापैकी 87 पुरुष व 29 महिला आहेत. तसेच 53 राखीव मतदान अधिकारी असून यापैकी 44 पुरुष व 9 महिला आहेत. निवडणूक प्रक्रियेतील इतर सर्व अधिकारी कर्मचारी  150 पेक्षा अधिकजन कार्यरत आहेत. या प्रक्रियेत 15 वाहनं उपलब्ध केली आहेत उप विभागिय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या बंदोबस्तात एक उप विभागीय पोलिस अधिकारी , 2 पोलिस निरीक्षक , 10 पोलिस उप निरिक्षक , 150 पोलिस अंमलदार , 100 होमगार्डस् , आरसीपी 1 प्लाटून , एसआरपीएफ 2 प्लाटून यांचा समावेश आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी आदिंसह अधिकारी-कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कटाक्षाने कार्यरत आहेत. प्रभाग 1 मधील मतदान केंद्र क्रमांक 1/1 जि.प.कें.प्रा.शाळा नयाकॅम्प किनवट व  1/2 जवाहरूल उलूम उर्दू हायस्कूल किनवट येथील मतदान पथकाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी स्वागत करून साहित्यासह रवाना केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर  शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
आधुनिक केसरी न्यूज  कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या...
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड 
कारगिल चौकातील अपघाताने गडचिरोली हादरले; “आधी नागरिक गेले, आज आरोग्य सभापती” : नगरपरिषदेसाठी इशार्‍याची घंटा