पुण्यातील कोट्यवधींच्या धाडसी घरफोडी नंतर मोहिदेपूर येथील सहा तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात..!
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील गल्ली नंबर पाच मधील ऋतुराज सोसायटीमधील विजय वैद्य नामक एका सोने-चांदी व्यापारी विजय वैद्य यांचा "अजय" नामक ३२ क्रमांकाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून ह्या व्हिडिओमध्ये बंगल्या मधून चोरी करून बाहेर पडणाऱ्या काही मुली दिसतात.... ह्या मुली जळगाव (जामोद) तालुक्यातील नाथजोगी समाजाचे वास्तव्य असलेल्या मोहिदीपूर येथील असून ह्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मोहिदीपूर येथे येऊन पुढील तपासासाठी ह्या मुलींना ताब्यात घेतले आहे.
वृत्तांत असा की पुणे येथील अजय नामक बंगल्यामध्ये काही दिवसापूर्वी डकैती, घरफोडी झाली आहे. सोने,चांदीचे व्यापारी असलेल्या व्यक्तीचा हा बंगला आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी करणाऱ्या मुली घर फोडून पळून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर ह्या सहा मुली मोहिदेपूर या आपल्या मूळ गावी आल्या. येथून त्यांनी आपल्याजवळील सोने-चांदीचा काही ऐवज खामगाव, नांदुरा, मलकापूर परिसरातील सराफा बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. कोट्यानवधीचा हा ऐवज अल्प किमतीत ते विकायला तयार झाले. हा सुगावा पोलिसांपर्यंत पोहोचला. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेचा व्हिडिओ ह्या आधारे पुणे पोलिसांनी जळगाव (जामोद) तालुका गाठून जळगाव जामोद पोलिसांच्या मदतीने ह्या मुलींना
अटक केली आहे.
तालुक्यातील पळशी(सुपो) गट ग्रामपंचायत अंतर्गत मोहिदेपूर हे शतप्रतिशत नाथजोगी समाजाची लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील माजी सरपंच रमेश शिंदे, पोलीस पाटील गोविंद शिंदे यांच्या नात्यातील सहा मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
_________________
आईना सुखदेव सोळुंके (वय अंदाजे २६),
मीना रवी सोळंके (वय अंदाजे २५),
सुनिता पिंटू सोळंके (वय अंदाजे ३०),
हिना शेषराव शिंदे( वय अंदाजे १८),
बत्ती गणपत शिंदे( वय अंदाजे २५),
पूजा कृष्णा सोळंके (वय २५),
असे सहा जणींची नावे आहेत. यातील सुनिता पिंटू सोळंके ही अपंग असल्याचे कळते. चार महिला विवाहित असून दोन अविवाहित आहेत.
पोलीस तपासासाठी मुलींना ताब्यात घेतले: पोलीस निरीक्षक नितीन पाटील.
पुणे येथील डकैती प्रकरणी मोहिदीपूर येथील मूळ रहिवासी सहा मुलींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला जळगाव (जामोद) चे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दुजोरा दिला आहे. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस मोहिदेपूरला आले असता पो.हे.कॉ. तय्यब अली सय्यद हे सुद्धा मोहिदीपूर येथे पुणे पोलिसांच्या सोबत होते. सर्व सहा मुलींना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुणे येथे त्यांची रवानगी करण्यात आल्याचे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.
हे कृत्य काळीमा फासणारे:
मोहीदेपूर येथील नाथजोगी समाज हा संपूर्ण राज्यभर पोट भरण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी देवादीकांचे सोंग धारण करून भिक्षा मागत असते. भिक्षा मागने हाच त्यांचा पिढीत व्यवसाय आहे. अशाच भिक्षा मागण्याच्या प्रकारात नागपूर येथील जरीपटका परिसरात संतप्त जमावाच्या हल्ल्यात एक तपापूर्वी मोहिदेपूर येथील चार युवक प्राणास मुकले होते. भंगार, प्लास्टिकच्या बाटल्या वेचणे, लोखंडी भंगार वेचणे असा धंदा करता करता ह्या मुलींनी माणुसकीची परिशीमा सोडली.
ह्या सहा मुलींनी केलेले हे कृत्य मोहिदेपुर च्या नावाला काळिमा फासणारे आहे. ह्या घटनेमुळे गावाची आणि नाथजोगी समाजाची फार मोठी बदनामी झाली आहे. असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर नाथ जोगी समाजातील सुशिक्षित युवकाने दैनिक आधुनिक केसरी शी बोलताना मांडले आहे.
झटपट श्रीमंत होण्याच्या या अफलातून संकल्पनेमुळे नाथजोगी समाजातील युवा वर्गावर सुद्धा ह्या घटनेचा दूरगामी परीणाम होणार आहे. पुनश्च या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोषी व्यक्तींना शासन झालेच पाहिजे असे सुद्धा संबंधित युवकाने सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List