चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घन घालून खून ; पतीची गळफास घेऊन आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घन घालून खून ; पतीची गळफास घेऊन आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे 

म्हसवड : हिंगणी, ता. माण जि. सातारा येथे चारित्र्याच्या संशया वरून पतिने पत्नीच्या डोक्यात दगड फोडायचा घन घालून खून केला व त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून ट्रॅक्टर च्या रबरी बेल्टने गळा आवळून स्वतःला फास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली यांची फिर्याद ज्ञानेश्वर वस्ताद झिमल यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादीने  07/10/2025 रोजी रात्रौ 10:00 वा. ते दिनांक 08/10/2025 रोजी सकाळी 06:00 वाचे दरम्यान मौजे हिंगणी  जि.सातारा गावचे हद्दीत आसळओढा येथे मयत आनिता बंडु घुटुकडे हीचे राहते घराचे बाजुला असलेल्या पत्र्याचे शेडमध्य़े माझे दाजी बंडु अंकुश घुटुकडे रा.हिंगणी ता.माण जि.सातारा याने माझी बहिण आनिता बंडु घुटुकडे हिचे चारित्र्यावर संशय घेवुन तीचे डोक्यात लाकडी दांडा असलेल्या लोखंडी घनाने मारुन गंभीर जखमी करुन तीचा खुन करुन स्वत: विषारी औषध पिवुन रबरी बेल्टने पत्र्याचे शेडचे अँगलला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे म्हणुन माझी बंडु अंकुश घुटुकडे रा.हिंगणी ता.माण जि.सातारा याचे विरुध्द तक्रार  दिली आहे.या घटनेमुळे हिंगणी गाव हादरले असून या खुणाचीच चर्चा गावामध्ये पाहवयास मिळत आहे. रणजित सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व गुन्ह्याच्या तपासासाठी योग्य त्या सूचना केल्या आहेत. या घटनेचा तपास सपोनि. अक्षय सोनवणे आणि त्यांची टीम करत असून श्वान पथक आणि ठसे तज्ञ व फॉरेन्सिक टीमला पाचारण करणेत आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि. ७ बारामती राज्यमार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत रात्री साडेदाहा च्या सुमारास ऊस वाहतूक...
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले, संविधान विरोधी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
जळगाव जामोदच्या बस स्थानकामधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता..!
शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..!