भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात

भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात

आधुनिक केसरी न्यूज

 निलेश मोरे

भिगवण : दि.११ नुकताच मोठा गाजावाजा करून घेतलेली फॉर्च्युर्नर गाडी आता रील स्टार प्रतीक शिंदेसाठी अडचणीची ठरली आहे. गुरुवारी सायंकाळी या गाडीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे भिगवण परिसरात अपघात झाला. या अपघातात तब्बल तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

◆अपघाताचा थरार
फिर्यादी निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, वय 35) हे आपल्या हुंदाई क्रेटा (एम.एच. 45 ए.यु. 9779) गाडीतून प्रवास करत होते. सायं. पाचच्या सुमारास मदनवाडी, सकुंडे वस्ती जवळील ऑस्करवाडी मिसळ हॉटेलसमोर, मागून भरधाव आलेली टोयोटा फॉर्च्युर्नर (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरात धडकली.
ही गाडी चालवत होता दुसरा कोणी नसून रील स्टार प्रतीक शिंदे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर, वय 24). धडकेचा जोर एवढा होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर (एम.एच. 12 एक्स एम. 3816) वर आदळली. काही क्षणांत तीनही गाड्या एकमेकांत आपटून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या.

◆पोलिसांत गुन्हा दाखल
या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेवरून भिगवण पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 229/2025 दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीक शिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उगले (ब. नं. 2637) करीत आहेत.

◆स्थानिकांमध्ये चर्चा
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच घेतलेली फॉर्च्युर्नर अशा प्रकारे अपघाताला कारणीभूत ठरल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “लोकप्रियतेच्या नादात फिल्मी स्टाईलने गाडी चालवण्यावर आळा बसलाच पाहिजे,” अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली  नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील देगलूर नाका भागातील एम जी आर गार्डन जवळील एका नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!
सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे