गोष्ट छोटी डोंगराएवढी
गोष्ट छोटी डोंगराएवढी ! राजकारणातल्या टीकेला आणि प्रेमातल्या आणाभाकांना जास्त महत्त्व द्यायचे नसते म्हणतात. अलीकडचे सत्तापिसाट राजकारण आणि सोशल
विशेष संपादकीय !
डॉ. प्रभू गोरे, संपादक
राजकारणातल्या टीकेला आणि प्रेमातल्या आणाभाकांना जास्त महत्त्व द्यायचे नसते म्हणतात. अलीकडचे सत्तापिसाट राजकारण आणि सोशल मीडियावरील बेगडी प्रेम बघून वरचे वाक्य शंभर टक्के खरे वाटू लागले आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए, असे म्हणून निवडणुका लढलेले आणि त्याच रामाच्या नावावर निवडून आलेल्यांनी सत्तेसाठी कशा रात्री जागवल्या आणि कशी तत्वे वेशीला टांगली हे जगाने पाहिले. आता हे सारे आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहोत ते तोंडाला फेस येईपर्यंत सांगत सुटले आहेत. मराठी माणसांचे कोणी आणि कसे वाटोळे केले याचाही नव्याने विचार मांडला जात आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि दोन, तीन पक्षांत पर्यटन करून सध्या भाजपवासी झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठी माणसाचा व नव्या शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना असल्याचाही आरोप केला. नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? मराठी माणसाची संघटना म्हणे.. मग.. बेस्टच्या जागा – बीएमसी काँट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी.. कपूर.. जॅकलीन, इथे कुठे शाखाप्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ? महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण.. त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा. तसेच, शिवसेनेतील बाटग्यांचे… महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी.. – सचिन अहीर – बीकेएसची जबाबदारी, राहुल कनाल – शिर्डी संस्था, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी – खासदार यादी मोठी आहे.. इथे कुठेही डाके.. रावते.. रामदास कदम.. शिवतारे.. राजन साळवी, सुनील शिंदे यासारखे जुने सैनिक दिसणार नाहीत. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषणे द्यायची!! असा थेट हल्ला चिरंजीव राणेंनी केला. ही टीका करताना छोटे सरकार हे विसरले की त्यांचे वडील कोण होते? कुठे होते? काय करत होते? ते म्हणतात ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवले की आपल्याकडे चार असतात. राणे पिता- पुत्रांकडे तर नऊ बोटे आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी चिरंजीव राणे यांच्या टीकेकडे कोरोनाच्या आकडेवारीसारखे दुर्लक्षच केलेले बरे. असो ! ही गोष्ट तशी छोटी आहे पण शिवसेनेसाठी डोंगराएवढी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल झाले आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या मनात काय सुरू आहे, याचा विचार पक्षप्रमुखांनी करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar

Comment List