माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा

माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा

आधुनिक केसरी

 संजय घोगरे

श्रीक्षेत्र माहूर  :  येथील श्रीदत्त शिखर संस्थानच्या दत्त मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि. 30 एप्रिल रोजी स. 9 वा. प. पू. प. म.श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या हस्ते   त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या (चांदीच्या धातूची )मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.यावेळी वेदमंत्राच्या उदघोषाने व दत्त नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.या विधीचे पौरोहित्य विलास जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले.
    श्रीदत्त शिखर मंदिरात पूर्वी पादुका व एकमुखी दत्ताच्या मूर्तीची पूजा केली जात असे.आता मात्र 20 किलो वजनाच्या 2.5 फूट उंची एवढ्या तीन मुखी दत्तात्रेयांचे भाविकांना दर्शन घडणार आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी प्रथम शाडू व प्लास्टिकचा साचा मुंबई येथील शिल्पकार तेजस भोईर यांनी बनविला असून चांदीची मूर्ती खामगाव येथील विश्वकर्मा ज्वेलर्स यांनी बनवली आहे.मूर्ती प्रतिष्ठापणा करतेवेळी मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज,चिंतामण भारती महाराज,दिलीप भारती महाराज,शिलानंद भारती महाराज, शाम भारती महाराज,अक्षय गिरी, गोवर्धनबन महाराज,मोहनदास भारती महाराज,वामन भारती, संतोष भारती, नितेश भारती,शिवाजी गिर्ही,माधव गिर्ही,सचिव डॉ. गणेश पाटील, व्यवस्थापक जी. एन.नाईक, लेखापाल प्रकाश गायकवाड यांचेसह मोठ्या प्रमाणात दत्तभक्त उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
आधुनिक केसरी न्यूज    छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतांनाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 
नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली