जय हो....बिल गेट्स यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल

ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज’मधील देशातील मोजक्या 10 स्टार्टअपमध्ये निवड 

जय हो....बिल गेट्स यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल

आधुनिक केसरी

छत्रपती संभाजीनगर : मॅजिक  (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council) या इनक्युबेशन केंद्राच्या पहिल्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या नियो फार्मटेकने ‘ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज’मध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, त्यांच्या नाविन्यपूर्ण पेस्टिसाइड स्प्रे पंपला जागतिक टेक उद्योजक बिल गेट्स यांनी दखल घेतली. भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) येथे आयोजित कार्यक्रमात नियो सोलर स्प्रेअर आणि नियो बाहुबली स्प्रेअर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला.

बिल गेट्स यांनी केवळ निरीक्षण न करता स्वतः नियो सोलर स्प्रेअर वापरून त्याच्या कार्यक्षमतेचा थेट अनुभव घेतला. हे सोलर-चालित स्प्रेअर पारंपरिक इंधन-आधारित स्प्रेअर्सच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देते. त्यांनी नियो बाहुबली स्प्रेअर देखील चाचणी केली, जे मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षमतेचे आणि मजूर खर्च वाचवणारे तंत्रज्ञान आहे आणि परदेशात देखील उत्पादनाला मोठी मागणी आहे. 

नियो फार्मटेकचा प्रवास २०१८ मध्ये सुरू झाली, जेव्हा संस्थापक योगेश गवांदे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात होते. त्यांचा कॉलेज प्रोजेक्ट मॅजिक च्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्पादनामध्ये विकसित झाला. मिलिंद कंक, सुनील रायथत्ता, प्रसाद कोकिळ, रितेश मिश्रा आणि आशिष गर्दे यांनी त्याला व्यवसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन, आर्थिक मदत, बाजारपेठेतील प्रवेश आणि औद्योगिक जोडणी मिळवून दिली.

यावेळी बोलतांना मॅजिक संचालक प्रसाद कोकीळ म्हणाले की, विद्यार्थी दशेतून महाविद्यालयीन प्रोजेक्ट ला प्रत्यक्ष प्रोडक्ट मध्ये रूपांतर करण्यात आले, मध्ये मॅजिक संस्थेने उत्पादन विकासात मोलाची भूमिका निभावली. मॅजिक च्या सहकार्याने, नियो फार्मटेकला Social Alpha आणि CoE FASAL (STPI, IIT Kanpur, IIMCIP) यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांशी संपर्क झाली, ज्यामुळे स्टार्टअपला वेगाने वाढता आला. आज नियो परदेशात आपले निर्यात करत आहे. 

आज, नियो फार्मटेकने ५०००+ युनिट्सची विक्री, १००+ रोजगार निर्मिती आणि ₹३ कोटींहून अधिक महसूल मिळवला आहे. संस्थापक योगेश गावंडे यांनी मॅजिकच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला की मॅजिकचे मार्गदर्शन आणि मदतीशिवाय हे यश शक्य झाले नसते. गेल्या दोन वर्षांत, गेट्स फाउंडेशनच्या मदतीने नियो फार्मटेक ने उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथे आपले उत्पादन मोठ्या प्रमाणावर पोहोचवले आणि हजारो शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण कृषी उपाय उपलब्ध करून दिले. या संपूर्ण प्रवासात महाराष्ट्र स्टेट इंनोव्हेशन सोसायटीने मौलाची मदत केली, असे तो म्हणाला.

यावेळी बोलतांना मॅजिक संचालक रितेश मिश्रा म्हणाले की नियो फार्मटेकचा हा प्रवास मेक इन इंडिया उपक्रमातील नवसंशोधनाचे सशक्त उदाहरण आहे. एका कॉलेज प्रोजेक्टपासून ते बिल गेट्स यांच्या दखलीपर्यंत, या स्टार्टअपने तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय शेतीमध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता दाखवली आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च
आधुनिक केसरी न्यूज राजरत्न भोजने खामगाव : भिमजयंती निमित्त ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये  कायदा व सुव्यवस्था अबाधित...
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उन्हाची दाहकता ...। नाथांच्या समाधीला व  पांडूरंगाला चंदन - उटीचा लेप 
इंटॅकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सिंह ठाकूर यांचा सत्कार
चंद्रपुरात चैत्र पौर्णिमेनिमित्त ५१ फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण
मग्रूर अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही कामामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिना निमित्त  रविवारी कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा..!