डॉ.माधवी खोडे चवरे यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा प्रभार

डॉ.माधवी खोडे चवरे यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा प्रभार

आधुनिक केसरी न्यूज

नागपूर : १३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार अपर विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी गुरुवार, दि. १३ मार्च २०२५ रोजी स्वीकारला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्याकडून डॉ. माधवी खोडे चवरे यांनी कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारला. कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर डॉ. माधवी खोडे चवरे यांनी वेळेवर परीक्षा घेत तातडीने निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती दिली. उन्हाळी २०२५ दरम्यान एक हजार पेक्षा अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य विद्यार्थी केंद्रित असावे, अशा देखील त्या म्हणाल्या. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, श्री अजय चव्हाण, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद  डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : येथील आसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपर फुटी प्रकरणात डॉ अटक...
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता
पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम
लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 
चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार 
खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई