शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक

शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबर महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना शरद पवार साहेब म्हणाले, निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या.  स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्या ठिकाणी असे कुठेतरी ऐकायला मिळतं असं नाही. परंतु संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळालं. आता त्याचा परिणाम लोकांच्या अस्वस्थता वाढली आहे. लोकांच्यातली चर्चा आहे, असंही शरद पवार साहेब यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. 

आज कुणीतरी अशा रीतीने पाऊल प्रभावी पाऊल टाकण्याच्या आवश्यकता आहे. हा लोकांच्यातील चर्चेचा सूर आहे, आणि त्याच्यात माहिती कळली बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला, आणि ते स्वतः महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणाने सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्पष्ट दिसते. पण, त्यांनी आज राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे काय सोयीचा नाही. त्यांनी एक प्रकारे जनतेचा उठाव या माध्यमातून केला आहे. संसदीय लोकशाही पद्धती ही उध्वस्त होईल असे चित्र आज या ठिकाणी दिसते. देशाची सूत्र आज ज्यांच्या हातात आहेत त्यांना याची काही पडलेली नाही इतकी चर्चा संबंध देशात आहे, असे शरद पवार साहेब म्हणाले.

आजच वाचलं आता ५ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लोकांचे बहुमत याला काही महत्त्व नाही. जे काही चाललंय ते राज्यासाठी अशोभनीय आहे. असेही शरद पवार साहेब यांनी बोलताना स्पष्ट केले.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले, त्याशिवाय संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होण्याचे चित्र आज देशात आहे. त्यात देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांना याचं काहीही पडले नाही. इतकी चर्चा देशात आहे. संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहात विरोधकांनी केला तर त्यांना बोलू दिले जात नाही. ६ दिवसांच्या अधिवेशनात रोज सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते हा मुद्दा मांडायला आम्हाला परवानगी द्या एवढी मागणी करतात पण ६ दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. संसदेत देशाच्या कुठल्याही प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ संपूर्ण संसदीय लोकशाही पद्धती यावरच राज्यकर्त्यांचा आघात आहे. लोकांमध्ये जावे लागेल, लोकांना जागरूक करावे लागेल. उठाव करायला हवा. आज त्याची आवश्यकता आहे. बाबांच्या आंदोलनामुळे हे आज ना उद्या उठाव झाल्याशिवाय राहणार नाही. असेही शरद पवार साहेब बोलताना म्हणाले.

दरम्यान, सत्तेचा गैरवापर आणि बड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी दिसतात. माझ्याकडे आता पुरावा नाही, काही लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे. काहींनी प्रेझेंटेशन दाखवले, आम्ही त्यांच्यावर फार विश्वास ठेवला नाही कारण आम्हाला वाटत होते, निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल वाटले नाही. निवडणूक आयोगावर आम्ही संशय व्यक्त केला नाही. परंतु निवडणुकीनंतर यात तथ्य आहे हे दिसून येते. फेर मतमोजणीत काही समोर येईल वाटत नाही. मतदानाच्या शेवटच्या २ तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. त्याचा विचार करावा लागेल. इंडिया आघाडीने एकत्रितपणे हा विषय चर्चेत घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत निर्णय होईल असे शरद पवार साहेबांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप