नवरात्रोत्सव विशेष : कपड्यांच्या व्यवसायाने मला जगायला शिकवले..!

व्यावसायिक सौ.वंदना गवळी यांची नवरात्रोत्सवाची चौथी माळ

नवरात्रोत्सव विशेष : कपड्यांच्या व्यवसायाने मला जगायला शिकवले..!

आधुनिक केसरी न्यूज 

लेखिका : सौ.किशोरी शंकर पाटील

सौ.वंदना रमेश गवळी, सांगली मिरज माहेरी गुरे, दुध दुभत्याचा व्यवसाय, अर्थिक परिस्थिती बेताची तरीही दोन भाऊ, चार बहिणी शेणगोठा, गुरांना चारापाणी, घरकामात आईला मदत करून आम्ही भावंडांनी शिक्षण घेतले.चौघी मुली वडीलांना मुलींच्या लग्नाचे टेंशन मॅट्रीक झाल्यावर लग्न करून सांगलीत आली. मिस्टर वसंत दादा सहकारी बँकेत नोकरीला होते. एकत्र कुटुंब घर बांधण्यासाठी कर्ज काढले त्यामुळे हातात पगार कमी यायचा अर्थिक चणचण घरी सासूबाईंची चिडचिड व्हायची. पहिला मुलगा झाला खर्च वाढत गेला. दोन तीन वर्षानी कर्ज फिटले. 

दुसरी मुलगी झाली. मुलगी थोडी मोठी झाल्यावर बँकेचे कलेक्शन (पिग्मी) गोळा करण्याचे काम सुरू केले. घरगुती अडचणी मुळे वेगळं रहायचा निर्णय घेतला. लहानशा फळ्यांच्या खोलीत राहीलो. काटकसर करून कर्ज काढून  पुन्हा दुसरं घर बांधलं. स्थीर स्थावर होई पर्यंत २०१४ साली मिस्टरांची बँक बंद पडली. काय करावे सुचत नव्हतं. पापड, लोणचे विकले, शिलाई काम केले. गोधड्या शिवल्या.मिस्टरांना कावीळ झाली. नेहमी टेन्शन मुळे पॅनीक व्हायचे. आजारपण सुरूच होते. अॅडमीट करावे लागले. भावाने खूप मदत केली. आधार दिला. त्यांचे ऋण आहेतच. आभाळ फाटलं होतं ढिगळं कुठे लावणार अशी परिस्थिती झाली होती. खूप कष्टप्रद  दिवस होते.

ऊन वारा पावसात  पायी नंतर  एक ३०० रूच्या जुनी  साईकलीवरून घरोघरी, दुकानात जाऊन  बँक कलेक्शन करायचे. पुन्हा बँकेत पैसे भरायचे. मुलं लहान असल्याने घरकाम,शाळेची तयारी कधी कधी दुपारी जेवायला ही मिळत नव्हते. शेजारचे मुलांकडे लक्ष द्यायचे. थोड्या दिवसांनी मोठ्या  बहिणीने मुंबई वरून ईमेटन ज्वेलरी पाठवली. बँक कलेक्शन करताना तेही विकत होते.हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरले मागणी वाढली मगं होलसेल आणून ईमिटेशन ज्वेलरी विकली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यासोबत साड्यांचा बिझनेस सुरू केला. घरी एका छोट्या खोलीत ज्वेलरी व साड्या ठेवायची  बायका एकमेकींच्या ओळखीने  यायच्या मगं एक रोडवर छोट दुकान भाड्याने घेऊन कृष्णतारा सासू सासऱ्यांचे नांव दिले. चांगले चालत होते. मिस्टरांची खूप साथ मिळाली. दुकान सांगलीत पूर आला तेव्हा नुकसान झाले. पुन्हा घरी बिझनेस सुरू केला. मिस्टर बँक बंद पडल्याने तेही पिग्मी एजंटचे काम करायचे. त्यांना नंतर नंतर फिरणे जमेना म्हणून किराणा दुकान सुरू केले. आम्ही दोघेही चालवतो. घरी ज्वेलरी व साड्यां चा बिझनेस सुरू आहे. मुलगा अनिकेत मॅकनिकल ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करतो. मुलगी अस्मिताने डिएड मेंदी कोर्स केला दोघांचेही  लग्न होऊन दोघांना कन्यारत्न आहेत. मागे वळून पहाताना आईवडीलांचे संस्कार प्रामाणिकपण लहान असल्याने मोठ्या भावंडांचे प्रेम आशीर्वादाने खूप श्रीमंती नाही पण सुख समाधानाने जीवन जगत आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच. मला जरा जास्तच करावा लागला.याप्रमाणे वागलं की ईश्वर सगळ्या अडचणीवर मात करण्याचे बळ देतो.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आरपीआय आंबेडकर पक्षाचे  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन  आरपीआय आंबेडकर पक्षाचे  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन 
आधुनिक केसरी न्यूज बुलढाणा : सविस्तर वृत्त असे की सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायालयीन कामकाज चालू असताना सहा ऑक्टोबर रोजी...
Breking News : एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट
एलएलबी परीक्षेस बसण्याची संधी द्या’ विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन
वाघाच्या डरकाळीने उडाली गोंदियाकरांची झोप
15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई, नाकाबंदीमध्ये फरार आरोपी पकडला, वैजापूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यात होता फरार
कटगुण गावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून