गाडगे बाबा चौकात फिल्मी स्टाईल दरोडा ; चाकूचा धाक,२० लाखांचा ऐवज लंपास
आधुनिक केसरी न्यूज
गजानन लक्षटटीवार
वणी : गाडगे बाबा चौकासारख्या मध्यवर्ती व गर्दीच्या परिसरात घडलेल्या धाडसी दरोड्याने वणी शहर हादरले आहे. प्रसिद्ध कोंडावार ज्वेलर्सच्या शेजारील घरात दि. ३० रोजी पहाटे १.४५ वाजता चार दरोडेखोरांनी अक्षरशः फिल्मी अंदाजात घरात धाड घालत सुमारे २० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, संजय निळकंठराव कोंडावार (७५) हे घरात असताना बाहेर चौकीदारी करणारे विलास वाडके (४०) यांच्यावर दरोडेखोरांनी प्रथम हल्ला चढवला. झटापट करत त्यांना चाकूचा धाक दाखवून घरात घुसून संजय कोंडावार यांनाही शस्त्राचा धाक दाखवत बांधून ठेवले.
दरोडेखोरांनी घरातील १२ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ४.५ लाख रुपये रोख असा मिळून २० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज घेऊन चक्क रफूचक्कर झाले. काही वेळानंतर दोघांनी स्वतःची सुटका करून पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता वणी पोलिस, गुन्हे शोध पथक तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना अशा प्रकारचा धाडसी दरोडा मुख्य चौकातच घडल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध तीव्र केला असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List