हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते.
देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात.
पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी?
प्रश्न गहन आहे...
हा महाराष्ट्रीयन सणांचा,
महाराष्ट्र धर्माचा,
मराठी संस्कृतीचा
गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा...
अपमान नाही का?
(माहितीसाठी 18 सप्टेंबर 2009 रोजी तत्कालिन पंतप्रधानांच्या निवासस्थानी तत्कालिन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचे फोटो आणि संबंधित बातमीची लिंक)
https://www.indiatoday.in/india/photo/pm-hosts-iftar-party-362556-2009-09-18/6
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List