आरोग्याच्या अपुऱ्या सुविधेमुळे गोमाल येथील अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृत्यू...
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जामोद : तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावातील अवघ्या १७ वर्षीय आदिवासी मुलीचा सुविधा अभावी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सागरीयाई हिरबामण्या असे मृत मुलीचे नाव आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या गोमाल येथील सागरीबाई या तरुणीला संध्याकाळी अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. परंतु रस्ता नसल्यामुळे तिला झोळी करून दवाखान्यात नेण्यात येत होते. परंतु रस्त्यातच तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे तिला पुन्हा गावी नेण्णासाठी तिच्या मृतदेहाला जांबूच्या ओळीतून न्याने लागले
असे विदारक चित्र तालुक्यात दिसून आले आहे. रस्ता व अपुऱ्या आरोग्य सुविधा अभावी आदिवासी महिला व बालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गोमाल या गावातील जवळपास २०० रुग्ण हे डायरियाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामध्ये अनेक महिला आणि बालकांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळातही आदिवासी भागातील ग्रामस्थांना मूलभूत
सुविधा मिळत नाही. आदिवासी भिंगाऱ्याच्या पुढे चाळीस टापरी व त्यापुढे गोमाल हे गाव आहे. भिंगाऱ्यापर्यंत रस्ता आहे. परंतु भिंगान्या पुढे रस्ता नाही. गोमाल ते भिंगारा है अंतर जवळपास ८ किलोमीटर आहे. या भागांत कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी आदिवासी गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Comment List