भाग्यश्री पतसंस्थेला मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

भाग्यश्री पतसंस्थेला मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

आधुनिक केसरी न्यूज 

नवरगाव : दि.३ व ४ ऑगष्ट २०२४ रोजी हैद्राबाद येथे थाटात  पार पडलेल्या  कार्यक्रमात भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव या संस्थेस सन  २०२३-२४  या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य  पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचा संस्थेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मानाचा समजला जाणारा राज्य स्तरावरील ठेवी १०० कोटी पुढील गटातून प्रथम क्रमांकाचा " दीपस्तंभ पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आलेला आहे. 

भाग्यश्री  पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे  संचालक नितीन जैस्वाल व अतुल शेंडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

विक्रमी व्यवसायासह सेवा कार्यासाठी आजपर्यंत जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नानाविध पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या भाग्यश्री पतसंस्थेचा या सन्मानाने संस्थेच्या लौकिकात भर पडलेली असून समाजाच्या नानाविध स्तरातून संस्थेवर कौतुकपर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी परिपूर्ण भाग्यश्री आता नानाविध ठेव व कर्ज सुविधा कार्यान्वित करतांना जलद कर्जवितरण सह,RTGS, NEFT, UPI,मोबाईल बँकिंग इत्यादी प्रभावी सेवा देत आहे.भाग्यश्री परिवाराच्या संचालनाची धुरा सद्यस्थितीत संस्थेचे अध्यक्ष दिवाकर थोटे, उपाध्यक्ष गोविंद बिसेन,सह सरव्यवस्थापक दत्ता बहादुरे यांचे कार्यकुशल नेतृत्वात संस्थेचे समस्त संचालक, अधिकारी, कर्मचारी व बिंदूसागर बचत प्रतिनिधी वृंद सांभाळत आहेत.या यशस्वी वाटचाली प्रसंगी संस्थेच्या समस्त सभासद, ग्राहक व हितचिंतकांचे भाग्यश्री परिवाराने आभार मानले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : २६ जून दोन भरधाव कारची आमोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू...
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!