तलाठी भरतीचा मार्ग मोकळा ; मॅटने स्थगिती उठवली

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा ; मॅटने स्थगिती उठवली

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर  : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेले ’जैसे थे’ आदेश मागे घेण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठीभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अश्विनी कोळसे, गोरखनाथ गव्हाणे व नितीन मगरे, योगेश्वरी चिंतामणी यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जांवर न्यायाधिकरणाने वरील आदेश दिला. तलाठीपदी निवड होऊन नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
    
🔹सामाईक परीक्षेच्या दुरूस्त उत्तरसुचीमुळे आपल्या गुणांकनावर विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे अंतिम निवडसुची रद्द करून त्यात आपल्या नावाचा समावेश करावा अशी मूळ याचिका मनीषा कंगले व शुभम बहुरे या उमेदवारांनी न्यायाधिकरणाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आहे. मुंबई न्यायाधिकरणाने अशाच स्वरूपाच्या याचिकेत ’जैसे थे’ आदेश दिल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठीभरती ’जैसे थे’ ठेवण्याचा आदेश येथील खंडपीठाने
दि. 19 एप्रिल रोजी दिला. परिणामी, संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी पदाची नियुक्तीप्रक्रिया थांबविण्यात आली.
    
🔹 दरम्यान, मुंबई न्यायाधिकरणापुढील प्रलंबित याचिकेत अंतिम सुनावणी होऊन तेथील याचिकाकर्त्यांची याचिका  मुख्य पीठाने खारीज केली. 
समान विषयासंबंधीची याचिका मुख्य पीठाने खारीज केल्याने 
संभाजीनगर येथील याचिकादेखील फेटाळण्यात यावी अथवा न्यायाधिकरणाने दिलेला ‘जैसे थे’ आदेश शिथील करण्यात यावा अशी विनंती हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने संभाजीनगर खंडपीठापुढे करण्यात आली. 

🔸 निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास भरतीप्रक्रिया अधिक लांबणीवर पडेल, तात्काळ पदभरती झाल्यास महसूल विभागावरील कामाचा बोजा कमी होईल त्यामुळे भारतीप्रक्रियेवरील स्टे उठवण्यात यावा असा युक्तिवाद हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने करण्यात आला. 
तो मान्य करून न्यायाधिकरणाने आपला स्थगिती आदेश मागे घेतला. मूळ अर्जाद्वारे दाद मागणार्‍या दोघा याचिकाकर्त्यांपुरती दोन पदे रिक्त ठेवून उर्वरीत 92 रिक्त जागांसाठी नियुक्ती आदेश जारी करण्यास कोणताही अडसर नसेल असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने ॲड चैतन्य धारूरकर व ॲड महेश भोसले यांनी काम पाहिले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गरजा कमी ठेवा; स्वाभिमानाने जगा : ना.पंकजाताई मुंडे  बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान..!  गरजा कमी ठेवा; स्वाभिमानाने जगा : ना.पंकजाताई मुंडे  बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान..! 
आधुनिक केसरी न्यूज बीड : संत भगवानबाबांनी एक्कर विका पण शाळा शिका असा संदेश दिला होता. आजच्या युगामध्ये शिक्षण तर...
फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यकृताचा भाग देऊन २२ वर्षीय करणला भावाने दिले जीवदान! यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांची मदत
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
हैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनाचा दणका आणि भेट,चर्चा..!