सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद सावकार पोरेड्डीवर तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची निवड

सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद सावकार पोरेड्डीवर तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची निवड

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळ या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीकरिता आज दि.३१ रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

या बैठकीमध्ये संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष असलेले अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी तर , आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे . सचिव पदावर प्रशांत शांताराम पोटदुखे यांना कायम ठेवण्यात आले असून कोषाध्यक्ष म्हणून संदीप गड्डमवार यांची तर , उपाध्यक्ष म्हणून सगुणाताई तलांडी  यांची निवड करण्यात आली आहे . सहसचिव पदी डॉ . किर्तीवर्धन दीक्षित यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. सुधाताई शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते . अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे व कार्यकारी अध्यक्ष म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची निवड झालेली असल्यामुळे संस्थेद्वारा संचालित सर्वच महाविद्यालय, शाळांमधील कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे . सर्व पदांवरची निवड ही सर्वानुमते करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी संस्थेला यशोशिखरावर नेण्यासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करेल असा आशावाद नवनियुक्त अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : दि.११ धनुष्यबाण हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केल्यास तो...
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या चंद्रपूरात
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा सरसावले; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकाच दिवशी तीन सभा..!
धरणे आंदोलनासाठी अधिकृत जागा द्या ! जालना येथील अशासकीय संस्थेच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी