लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...

लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...

आधुनिक केसरी न्यूज 

धाराशिव : चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना कळंब पोलीस ठाण्यातील रामचंद्र किसन बहुरे व त्याचा साथीदार पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावानजीक उपळाई पाटी आहे. या ठिकाणी तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटसमोर काही दिवसांपूर्वी ३ शेळ्या व बोकड बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आले. शेळ्या आणि बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता किरकोळ कारवाई करून त्याला दिलासा दिला. याप्रकरणात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बहुरे आणि पोलीस हवालदार मुंढे यांनी ढाबा चालकास मदत केल्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांचे बक्षीस मागितले. पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच बक्षीस रुपाने मागून ती स्वीकारल्याबद्दल शिकाऊ पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. वरील दोघांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपाला अपयश आले होते मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  पक्षश्रेष्ठींनी लक्ष...
वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली 
चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 
चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी
अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना