आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी

आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी

आधुनिक केसरी न्यूज 

दिपक सुरोसे

 शेगांव : श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि. बुलढाणा
(पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल.) श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंद करण्यात आले आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत जातानाच आपापले मोबाईल बंद  करणे आवश्यक आहे.
श्रींच्या मंदिरांच्या परिसरात सध्या मोबाईलचा अतिरेक झाला आहे. मोबाईलमधून सेल्फी काढणे, फोटो काढणे, मोठ्या आवाजात संभाषण करणे, व्हिडिओ काढणे आदी कारणांमुळे श्रींच्या मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होत आहे. देवदर्शन करताना त्यांची एकाग्रता भंग होत आहे. यामुळे भाविकांना यापुढे आपला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे. श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव यांनी श्रींच्या मंदिर परिसरातील शिस्त, शांतता आणि पावित्र्य राखण्यासाठी घेतलेला हा निर्णय भाविकांच्या सोयीसाठीच आहे. योग्य व्यवस्थापन आणि भाविकांना श्रींचे शांततेत दर्शन मिळावे हा यामागचा शुद्ध हेतू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी या नियमांचे पालन करून संस्थानला सहकार्य करावे हि नम्र विनंती करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज  पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन...
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही : सुनेत्रा पवार