ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : ग्रामीण पोलिसांनी बळीरामपुर व गुरुरामदास नगर वजिराबाद येथे धाड टाकून ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७४६ अवैध तलवारी व खंजीर शस्त्रसाठा जप्त केला असून दोन जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई राज्यात सर्वात मोठी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरील कारवाईचे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी कौतूक केले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश कुसमे हे ६ मे रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांला बळीरामपुर भागात कोंबिग मोहीम राबवित असताना व गस्त घालतांना त्यांना एक जण कमरेला खंजीर व तलवार घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव अभिजित गिरीधर सातपुते असे सांगितले. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरील हत्यार हे अबचलनगर येथील जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमनी यांच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. पोलिसांनी रात्री ग्रामीण पोलिसांनी वजिराबाद पोलिसांना सोबत घेत अवैध शस्त्रसाठा आसलेल्या ठिकाणी धाड टाकून ३१५ मोठ्या तलवारी, 315, छोट्या तलवारी, काळ्या रंगाच्या गुप्त्या 25, पांढऱ्या रंगाच्या गुप्त्या 81, काळ्या पात्याचे खंजीर-198, हिरव्या मुठीचे खंजीर-275, ग्रे कलरचे खंजीर 116, पांढऱ्या रंगाचे खंजीर-15३, पिवळ्या मुठीचे खंजीर-243 इतर छोटे, एकत्रीत खंजीर- 417, छोटे फोल्डींग चे खंजीर 2550 कुकरी खंजीर 28, फोर फिंगर ग्रीप नकल खंजर 28, हत्तोडे 3, पक्कड व अंबुर 3 प्रत्येकी, स्कु ड्रायव्हर 4 असा ४ हजार ७४६ अवैध शस्त्रसाठा जप्त केला असून 43 लाख 48 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी अभिजित गिरीधर सातपुते व जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला ४३ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा हा राज्यातील सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरील घटना समजताच पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण अवैध शस्त्र साठ्याची पाहणी केली. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश कुसमे, ज्ञानेश्वर मटवाड व त्यांचे सहकारी वसंत केंद्रे, समीर अहमद, शंकर माळगे, संतोष पवार, चावरे, धम्मा कांबळे, सिरमलवार, रुक्मीणी कानगुले यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List