अन् जिल्हाधिकारी अचानक गेले थेट बियाण्यांच्या दुकानात
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : बियाणे विक्रेत्यांकडे आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. बियाणे विक्रेत्यांचे गोडावून, दुकाने तसेच त्यांच्याकडील विविध नोंदींची तपासणी केली. बियाणे खरेदीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.
आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास जाधववाडी, नवा मोंढा भागात विविध कृषी सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी भेटी देवून बियाणे, रासायनीक खते यांच्या उपलब्धतेबाबत विक्रेत्यांकडील साठा नोंदवह्या तपासुन खातरजमा केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख त्यांच्या समवेत होते. बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणे, बियाणे,खते उपलब्ध असताना न देणे, साठेबाजी करणे याबाबत चौकशी केली. खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्याव्या अशी सुचनाही त्यांनी केली.
०००००
Comment List