कृष्णपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

कृष्णपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

आधुनिक केसरी न्यूज 

फुलंब्री : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद तालुक्यातील कृष्णपुरवाडी शिवारातील शेतात गट नंबर ६ मधील कोरड्या विहिरीत  दिनांक ८ जुन रोजी मृतदेह आढळून आला होता. यामध्ये फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तर पुढील कारवाई साठी अडचण येत असल्याने मृतदेहाला कोणी ओळखते का ? असे आवाहन फुलंब्री पोलीसांसमोर असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहे.
या साठी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी सांगितले की, कृष्णपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे परंतु त्या मृत व्यक्तीला कोणी ओळखत आहे का यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या व्यक्तीचे वय ५५ ते ६० वर्षे, रंग सावळा उंच पाच फुट, अंगात पांढरा रंगाची बनियन व निळ्या रंगाची नाईट पैंट असा वर्णनाचा अनोळखी व्यक्ती आहे कुणाची ओळख असेल तर फुलंब्री पोलीस ठाण्याला कळवावे. असे आवाहन फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने व पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्या सह आदींनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार