कृष्णपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला
आधुनिक केसरी न्यूज
फुलंब्री : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद तालुक्यातील कृष्णपुरवाडी शिवारातील शेतात गट नंबर ६ मधील कोरड्या विहिरीत दिनांक ८ जुन रोजी मृतदेह आढळून आला होता. यामध्ये फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तर पुढील कारवाई साठी अडचण येत असल्याने मृतदेहाला कोणी ओळखते का ? असे आवाहन फुलंब्री पोलीसांसमोर असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहे.
या साठी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी सांगितले की, कृष्णपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे परंतु त्या मृत व्यक्तीला कोणी ओळखत आहे का यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या व्यक्तीचे वय ५५ ते ६० वर्षे, रंग सावळा उंच पाच फुट, अंगात पांढरा रंगाची बनियन व निळ्या रंगाची नाईट पैंट असा वर्णनाचा अनोळखी व्यक्ती आहे कुणाची ओळख असेल तर फुलंब्री पोलीस ठाण्याला कळवावे. असे आवाहन फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने व पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्या सह आदींनी केले आहे.
Comment List