सार्वजनिक पाणीपुरवठाच्या विहिरीचे पाणी बेकायदेशीरपणे विक्री ;कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी 

सार्वजनिक पाणीपुरवठाच्या विहिरीचे पाणी बेकायदेशीरपणे विक्री ;कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी 

आधुनिक केसरी न्यूज 

सिध्दार्थ वाठोरे

हदगाव : सार्वजनिक  पाणीपुरवठाच्या विहिरीचे पाणी बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी यासाठी दि. २१ रोजी चिकाळा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी हदगाव यांच्या कडे केली कारवाईची मागणी केली आहे. 

 हदगाव तालुक्यातील मौजे चिकाळा येथील नागरिकांसाठी शासकिय योजनेतून एकुण तिन विहिरीतील जलसाठा उपलब्ध आहे. मागील २५ वर्षापासुन ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सार्वजनिक विहिरीतील पाणी परिसरातील शेतक-यांकडून आर्थिक तडजोड करुन शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांना देत असल्याने संबंधीत शेतकयांच्या पिकांसाठी मुबलक प्रमानात जलसाठा राखीव ठेवण्यासाठी गावातील नागरीकाना अत्यंत अल्प प्रमाणात पाणी पुरवठा करीत असून संबंधीत कर्मचाऱ्यांस व सरपंच यांना या बाबत नागरीकांनी अनेक वेळी पाणी पुरवठा करण्यासाठी तोंडी विनंती केली होती. 
विहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याचे सांगितले नागरिकांच्या अत्यल्प पाणीपुरवठया बाबतच्या तक्रारी वाढल्याने दिनांक: १९.०२.२०२४ रोजी ग्रामसेवक, उपसरपंच माजी सरंपच व ग्रामपंचायत सदस्य आदिनी तिन्ही विहिरीवर जाऊन पाहणी केली. 
असता विहिरीत पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. 

तसेच सदरील सार्वजनिक विहिरीतील पाणी विहिरीच्या भोवती असलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी पाईप व मोटार बसविलेली दिसून आली. सदरील सार्वजनिक विहिरीचे बेकायदेशीरपणे पाणी घेणाऱ्या शेतक-यांस याबाबत विचारले असता त्याने दमदारी करीत आम्ही मागील २५ वर्षापासुन पाणी घेता, तुमच्याने जे होते ते करुन घ्या. इतके दिवस तुम्ही काय झोपले होते का ? म्हणून शिवीगाळ केली तसेच मारहाण करण्याची धमकी दिली आहे असे निवेदनात नमुद आहे. 

"सार्वजनिक पाणीपुरवठाच्या विहिरीचे पाणी बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल".

यादव लालबा मनपुरवे  

ग्राम पंचायत सदस्य  

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हा सन्मान जनतेला समर्पित... हा सन्मान जनतेला समर्पित...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : पूर्व विदर्भातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा  लोकमत लोकनायक कॉफी टेबल बुक प्रकाशन समारंभ तथा...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस
गौराईला आज पुरणपोळी म्हणजे मुख्यमंत्री जेवनाचा बेत 
आरोग्याच्या अपुऱ्या सुविधेमुळे गोमाल येथील अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृत्यू...