नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडो-आयरिश हॉस्पिटलचे 26 फेब्रुवारी ला लोकार्पण;अत्याधुनिक आरोग्यसेवेला विश्वास व सामाजिक बांधिलकीची जोड देणार - डॉ दिलीप जोंधळे

नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडो-आयरिश हॉस्पिटलचे 26 फेब्रुवारी ला लोकार्पण;अत्याधुनिक आरोग्यसेवेला विश्वास व सामाजिक बांधिलकीची जोड देणार - डॉ दिलीप जोंधळे

आधुनिक केसरी न्यूज

अहमदनगर -  अहमदनगर येथील इंडो-आयरीश जनरल ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता केंद्रीय दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ दिलीप जोंधळे यांनी दिली. या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम भय्या जगताप, मा. मंत्री आ.बबनराव पाचपुते, मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जि.प.चे सीईओ आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अत्याधुनिक आरोग्यसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत आरोग्यसंपन्न, आनंदी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.  आयर्लंड येथे तब्बल ३३ वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉ.दिलीप जोंधळे  हे मूळचे संगमनेर  आश्वी येथील, त्यांनी बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस  आणि  एम.डी. (मेडिसीन) केले व  १९८९ मध्ये  आयर्लंड येथे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करून आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देत मोठा नावलौकिक  मिळवला.
अहमदनगरमध्येही इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी सेंटर सुरु करण्यात येणार आहे.   मधुमेहानंतरच्या हृदयरोग, किडनी विकार, गँगरीन सारख्या गुंतागुंतीच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी डायबेटिक डे केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. उतारवयातील स्मृतीभ्रंशासारख्या समस्यांवरही विशेष उपचारा बरोबरच,  हाडे ठिसूळ होतात. यावर बोन डेन्सिटीसारख्या तपासण्या करून वृध्दांवर उपचार केले जातील.  इंडो आयरिश हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे.  यामध्ये १७० बेडस असून ५० बेडचा सुसज्ज आयसीयू आहे. बालरूग्ण तसेच नवजात शिशुंसाठी आयसीयु बेडची स्वतंत्र व्यवस्था आहे.
हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसीन, मधुमेह, वृध्दापकाळ, कार्डिओलॉजी, मूत्रविकार, स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण, बालरोग, नवजात शिशु, अस्थिरोग, जनरल सर्जरी, कान,नाक,घसा, फिजिओथेरपी, फार्मसी, रेडिओलॉजी, स्वत:चा अत्याधुनिक पॅथोलॉजी  तपासणी विभाग आहेत. पक्षाघात, मेंदू शस्त्रक्रिया, शारीरीक दुखापत, हार्ट सर्जरी झालेल्या रूग्णांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटरही येथे असणार आहे.

उच्च दर्जाची कार्डियाक कॅथलॅब, ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, डोळे, कान, नाक,घसा, दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सर्जिकल ऑपरेशन थिएटर हॉस्पिटलमध्ये आहे. एक मजला पूर्णत: आई व बाळासाठी असेल. डिलिव्हरीवेळी महिलांना बी.पी.वाढणे, मिरगी येणे असे प्रकार होतात. यासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर व संलग्न आयसीयुची व्यवस्था आहे.१२ बेडचे सुसज्ज डायलेसिस विभागही कार्यान्वीत  आहे.
    सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स रे, डायलेसिस सेंटर, सुसज्ज ऑपरेशन थिएटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यादृष्टीने वेळीच प्रतिबंध होण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी व उपचार सुविधा देण्यात येणार आहे.
यामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले लिव्हर ट्रान्स्प्लांट तज्ज्ञ डॉ.मनोज डोंगरे हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा देणार आहेत. तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची मोठी टिम हॉस्पिटलमध्ये आहे. यात संचालक डॉ.दिलीप जोंधळे, डॉ.वसुधा जोंधळे यांच्यासह डॉ.सुहास जाधव, डॉ.शिबानी जोंधळे, डॉ.दिग्विजय जोंधळे, डॉ.विक्रांत काळे, डॉ.श्वेता काळे, डॉ.प्रशांत काळे, डॉ.मिनल काळे, डॉ.दीपक नाईकवाडे, डॉ.मिलिंद कोरडे, डॉ.प्रदीप कंठाळी, डॉ.प्रतिभा पवार, डॉ.गणेश मिसाळ, डॉ.शरद गारुडकर, डॉ.योगिता  पवार, डॉ.कोमल लढ्ढा, डॉ.वेदांत लढ्ढा, डॉ.किशोर गाढवे, डॉ.भावना गाढवे, डॉ.सुहास घुले, डॉ.स्वाती घुले, डॉ.बाबा शिंदे, डॉ.दिलीप पडघन, डॉ.सिंधू पडघन, डॉ.अस्मिता डोंगरे, डॉ.साईप्रसाद शिंदे यांचा समावेश आहे.हॉस्पिटलमध्ये  २०० जणांचा प्रशिक्षित स्टाफ  असून अद्ययावत नर्सिंग कॉलेजही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीषण अपघातात दोन ठार, 11 जखमी  अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुर्घटना भीषण अपघातात दोन ठार, 11 जखमी  अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुर्घटना
आधुनिक केसरी न्यूज नेवासा  : तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला,...
कसारा घाटात शिवशाहीचा ब्रेक फेल ;चालकाने ४० प्रवाशांचे प्राण वाचविले 
रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल : विजय वडेट्टीवार
सुपा पोलिसांकडून घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारांची बाजारपेठेतून धिंड
चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान
अम्मा की पढाई –विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम :आ.किशोर जोरगेवार
अखेर आदिवासी समाजाची प्रतीक्षा संपली,समाजाच्या न्यायासाठी सरकारचे निर्णायक पाऊल..!