क्षेत्र अडबंगीनाथ जन्मभूमी व तपोभूमीत धर्मबीज सोहळ्याचे आयोजन
आधुनिक केसरी न्यूज
किरणकुमार आवारे
निफाड :- नवनाथांपैकी एक अडबंगीनाथ महाराज यांची जन्मभूमी व तपोभूमी असलेल्या, श्री गोरक्षनाथ मंदिर धामोरी ता.कोपरगाव येथे धर्मबीज निमित्त शनिवार दि.३फेब्रुवारी २०२४ ते दि.११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले धामोरी नवनाथ संप्रदायाचे आदीपीठ असुन अडबंगीनाथाचे जन्मस्थान व तपोभुमी आहे. नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय ३४ वा, ओवी क्र.६२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे श्री गोरक्षनाथांनी अडबंगीनाथाना दिक्षा देऊन आपल्या पदस्पर्शाने हे स्थान पुनीत केले आहे. येथे अडबंगीनाथांनी बारा वर्षे तप केले आहे. या जागेवर नवनाथाचे भव्य मंदीर व जगाच्या पाठीवर कुठेही नाही असा नऊ विराट फांद्यांचा वृक्ष हा गोरक्षचिंच म्हणुन प्रख्यात आहे. या वृक्षास येणारे फळ हे नारळा सारखे आकाराचे असते. अत्यंत प्राचिन आयुर्वेद शास्राधारे सदरच्या गोरक्षचिंचेची पाने, फळे व साल हे बहुरोग नाशक म्हणुन प्रसिध्द असुन भाविकांना त्याचा लाभ मिळतो. हा प्राचीन वृक्ष बघण्यासाठी अनेक भक्त येत असतात. सालाबादप्रमाणे धर्मनाथ बीज सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
शनिवार दि.३ फेब्रुवारी २०२४ ते दि.११ फेब्रुवारी २०२४ दररोज सकाळी श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण, शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत वकील राजेंद्र बदामे यांच्या शुभहस्ते शनिदेव अभिषेक, सांय. ५ ते ६ यावेळेत ह.भ.प.मधुकर महाराज गडाख यांचे प्रवचन, शनिवार दि.१० फेब्रुवारी दुपारी ४ ते ६ प.पु. संतश्री दत्तानंदगिरी महाराज यांचे प्रवचन, रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा.प.पु.संतश्री दत्तागिरी महाराज यांच्या हस्ते
श्री नवनाथ ग्रंथपूजन होईल. सकाळी ८ ते ९ वेळेत भिक्षा फेरी व श्री नवनाथ पालखी मिरवणूक, कलश पुजन, सकाळी १० वा. ह.भ.प. शिवाजी महाराज भालुरकर यांचे किर्तन होईल. सकाळी ११.४३ वा. प.पु.गुरुवर्य संतश्री रमेशगिरीजी महाराज हे अमृतसंदेश देतील. त्यानंतर पुरातन काळापासून चालत आलेल्या आमटी भाकरेचा महाप्रसाद होईल. यावेळी खा. सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, विवेक कोल्हे, मनेश गाढे, सुधाकर दंडवते, दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते कलशपूजन होईल.
या धर्मनाथ बीज सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन विजय जाधव, विश्वास जाधव, सौ विमल बोरसे, बाबासाहेब मांजरे, राहुल जाधव, अभिजीत जाधव, बाळकृष्ण मांजरे, विद्याताई पाटील, विलासी कदम, ऐश्वर्य दिघे, चेतन कदम, विजयमाला खैरनार, राधिका पाटील, गोरक्ष बोरसे, विश्वावती काळे, रागिणी देशमुख, अडबंगीनाथ सेवा भक्त मंडळ, गोरक्षनाथ सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, आनंदवल्ली मित्र मंडळ, जाणता राजा मंडळ, ए वन मंडळ, न्यु इंग्लिश स्कूल शाळा, के.बी. रोहमारे महाविद्यालय सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List