अनुलोम अनुगामी लोकराज्य व अभियान संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन....
आधुनिक केसरी न्यूज
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यामधील लिहा जहागीर येथे अनुलोम-अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा गरजू लाभार्थींने लाभ घेतला. या शिबिरात गावातील ११२ लाभार्थींने आपले नेत्र तपासून घेतले. यात १२ जणांना मोतिबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ज्यांना व्यक्तींना चष्मा नंबर आहे अशा गरजूंना अल्प दरात चष्मा उपलब्ध करून देण्याचे काम अनुलोम संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या शिबिरासाठी अनुलोम चे भाग जनसेवक श्री.सुहास दुतोंडे,वस्तीमित्र श्री.समाधान पाटील नवले,स्थानमित्र श्री.ज्ञानेश्वर रसाळ यांनी मेहनत घेतली.
यावेळी सरपंच श्री.सुधाकर पवार, उपसरपंच श्री.ज्ञानेश्वर निकम,माजी सरपंच श्री.आसाराम पाटील चव्हाण,माजी चेअरमन श्री.फकीरराव बनकर, सुखदेव पवार,भावसिंग बैनाडे,महादु दांगोडे, परमेश्वर सावळे,सुर्यकांत वाघ, कारभारी बनकर, योगेश नवले, नारायण रसाळ, गणेश करवंदे,सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List