माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने 

विद्यापीठात स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती मासिक व्याख्यानमालेत केले मार्गदर्शन 

माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने 

IMG-20231129-WA0471आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : माध्यमे बदलतात मात्र बातमीचे स्वरूप कधीही बदलत नाही. कारण सत्य हा बातमीचा मुळ व मुख्य निकष आहे. बातमी ही सत्य असते, बातमीचा सोर्स मात्र पक्का असला पाहिजे. माध्यम कोणतेही असले तरी प्रेझेंटेशनमध्ये बदल होतो, बातमीत नाही. बातमीची भाषा त्या त्या माध्यमांप्रमाणे बदलत असते, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसवांद व वृत्तपत्र विद्या विभागात स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ मासिक व्याख्यानमालेचे बुधवारी 'बातमीचे बदलते स्वरूप' या विषयावर सोळावे पुष्प गुंफताना डॉ. मिलिंद दुसाने बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव सानप तर व्यासपीठावर प्रा. डॉ. संजीवकुमार साळवे, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, डॉ. प्रभू गोरे, प्रा. बसवेश्वर बिरादर, प्रा. रमेश वाघ, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, संदीप घंटे आदींची उपस्थिती होती.   
यावेळी पुढे बोलताना डॉ. दुसाने म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य आदोलनासाठी जनजागृती  करणे ही  पत्रकारितेची भुमिका होती. ती तत्कालिन सरकार विरोधी असायची. मात्र सरकार विरोध म्हणजे पत्रकारिता असे नाही. प्रिंट मीडियामध्ये जागेची, शब्दांची मर्यादा असते. कमी जागेत आशय व्यक्त करणारी बातमी द्यावी लागते. आकाशवाणीमध्ये ऑडिओ पाठवणे त्यावर एडिटिंग करणे ती बातमी किती वेळेची द्यायची हे महत्त्वाचे असते. दूरचित्रवाणीमध्ये काही बातम्या वेळ घालवण्यासाठी दाखवल्या जातात. प्रत्येक बातमी ही संपादकाच्या नजरे खालून जात असते. त्या बातमीची कोणावर तरी जबाबदारी असते. आता सोशल मीडियात पत्रकारिता करताना सर्वांनीच जबाबदारीचे भान ठेऊन काम केले पाहिजे, असे आवाहनही शेवटी डॉ. दुसाने यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. परळी येथे मोहनलालजी बियाणी यांनी मराठवाडा साथी हे वृत्तपत्र सुरू केले. आज हे वृत्तपत्र विभागीय स्तरावर नावलौकिक पावले आहे. पत्रकारिता करताना शब्दांचा खेळ खेळता आला पाहिजे व बातमी लिहीत असताना समाजभानही असले पाहिजे, असे  डॉ. सानप म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित भिंगारे, गायकवाड मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका