मराठा आरक्षणासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : जिल्ह्य़ातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथील इयत्ता 10 वीत शिकत असलेल्या 16 वर्षीय तरुणाने मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे,असे लिहून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. 
        अत्महत्या करणाऱ्या मराठा युवकाचे नाव ओमकार आनंदराव बावणे असे आहे. तो संत ज्ञानेश्वर विद्यालयातील धुप्पा या शाळेत शिक्षण घेत होता. सद्या दहावी बोर्ड परिक्षा फिस भरणे शाळेत चालू आहे. वडिल गावात त्यांच्याकडे अत्यल्प शेतजमीन असल्यामुळे मोल मजुरी करून कुटुंबाची गुजराण चालवतात. वडिलांकडून परिक्षा फिस, शालेय साहित्य पुरवण्यासाखी कौटुंबिक परिस्थीती नसल्याने या विषयी कुटुंबात गेल्या बर्‍याच दिवसांपासून सातत्याने चर्चा करायचा असे असताना आपल्या समाजास शासन आरक्षण का देत नाही. आरक्षण नसल्यामुळेच आपली व आपल्या समाजाची परिस्थीती झाली आहे असे तो कुटुंबातील सदस्यांशी बोलत होता. शेवटी या नैराश्यातून त्याने मराठा आरक्षण व आपली कौटुंबिक परिस्थिती चिठीत सांगून आपली जीवन यात्रा विहिरीत उडी घेऊन संपवली. सदर घटना रामतीर्थ पोलिस हद्दीतील भोपळा गावी रविवार दिनांक 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी 04:30 ते 05 वाजताच्या सुमारास घडली सदर घटना घडली. माहिती कळताच रामतीर्थ पोलीस घटनास्थळी पोहचून मयत ओमकार यास शवविच्छेदनासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे पण मराठा समाज व ओमकार बावणे कुटुंबियांच्या वतीने जोपर्यंत मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देवुन त्याच्या कुटुंबियांना 50 लाखाची अर्थिक मदत व कुटुंबातील एकास शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन न करू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... नायगाव रूग्णालय परिसर मराठा आरक्षण व ओमकार बावणे आमर रहे.... च्या घोषणाणी मराठा आंदोलकांनी परिसर दणाणून काढला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार