औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे

आधुनिक केसरी न्यूज 

औरंगाबाद :  विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत साम टि. व्ही.चे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली, त्यात समितीचे सदस्य चक्रधर दळवी, अनिल महाजन, डॉ. माधव सावरगावे, विनोद काकडे, अरुण सुरडकर यांनी सहभाग घेतला.

डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.  औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी काम पाहिले. यावेळी समिती सदस्यांसह माहिती अधिकारी डॉ मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.

*****

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका