बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातमध्ये तांडव,मुसळधार पाऊस,झाडे कोसळली

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातमध्ये तांडव,मुसळधार पाऊस,झाडे कोसळली

आधुनिक केसरी न्यूज

अहमदाबाद : महाचक्रीवादळ बिपरजॉय जसजसे पुढे सरकत आहे तसतसा त्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं मोठा फटका बसण्याची भीती वर्तवली जात आहे. केंद्र सरकारकडून ८ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नौदल, हवाई दल, आर्मी, एनडीआरएफसह सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. ७४ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ कच्छमध्ये धडकण्यास सुरुवात झाली आहे. या काळात ११५-१२५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. सध्या सौराष्ट्रात सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील. यानंतर वादळ कमकुवत होऊन राजस्थानकडे वळेल. मात्र, त्यापूर्वीच कच्छ, जामनगर आणि द्वारकामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि झाडे पडल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. अनेक भागातील वीजही खंडित झाली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या धोक्याबाबत केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वजण सतर्क आहेत. NDRF च्या १७ टीम आणि SDRF च्या १२ टीम गुजरातमध्ये तैनात आहेत. त्याचबरोबर नौदलाची ४ जहाजे सध्या स्टँडबायमध्ये ठेवण्यात आली आहेत. किनाऱ्यालगत राहणाऱ्या ७४००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह ९ राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही ९ राज्ये आहेत.

IMD नुसार, वादळाच्या लँडफॉल प्रक्रिया संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झाली, जी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. त्यामुळे गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. दुसरीकडे जखाऊ बंदराच्या पुढे नलियात वाऱ्याचा कमाल वेग ताशी ९५ किमी होता. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मांडवी, मुंद्रा, नलिया आणि लखापतमध्ये वीज खंडित करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील सर्व शाळा १६ जून रोजी बंद राहतील.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार