*छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी!*

छत्रपती संभाजीनगरातील तरुणांचा अनोखा जल्लोष

*छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती  राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी!*

 

आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी महाराज यांची पहिली वाहीली जयंती महोत्सव उत्साहात महाराष्ट्र सदन सभागृह दिल्ली तेथे १४ मे रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रर्माचे आयोजान
छत्रपती संभाजी महाराज  जयंती महोत्सव समिती २०२३ दिल्ली यांचे वतीने करण्यात आले होते.
        जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य असे दीपोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष किशोरभाउ चव्हाण, अध्यक्ष विलासभाउ पांगारकर, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी परिश्रम पुर्वक या जयंती महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
            छत्रपती संभाजी महाराज यांची पहिली वाहीली जयंती महोत्सव स्वरूपात नवी दिल्ली येथे साजरी करतांना पुर्वसंध्येला दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते यात हजारो दिप मान्यवरांच्या उपस्थित प्रज्वलीत करण्यात आले होते.या प्रसंगी संभाजी महाराजांच्या जय घोषाने संपुर्ण महाराष्ट्रात सदन घोषणांनी दुमदुमून गेले होते.
दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी  सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांची पहिली वाहीली जयंती दिल्लीत साजरी करताना लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाउ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे, मराठा रामनारायण, कमलेश पाटील, मराठा रामनारायण, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के आदि प्रा.डॉ. राजाराम दमगीर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जयंती महोत्सवास सुरुवात करण्यात आली.
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी अनेक बाबी स्पष्ट करताना राजधानी दिल्लीत
छत्रपती संभाजी महाराज यांची पहिली वाहीली जयंती साजरी करण्यामागची भुमिका विशद करताना आमच्या समितीच्या सततच्या पाठपुराव्या मुळे नुकतेच महाराष्ट्र शासनाने १४मे हा दिवस महापूरुषांच्या साजऱ्या करण्यात येणाऱ्या यादीत केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त करुन स्वराज्याची संकल्पना प्राणपणाने राबविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा १४ मे हा जयंतीचा  दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना काढण्याची महत्वपूर्ण सूचना करून मराठा टुरिझम नावाने आगळे वेगळे शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केन्द्र शासनाने हाती घ्यावा असे नमूद करून या पुढील काळात आठरा पगड जातींच्या इतिहासाचे योग्य ते संदेश जगा समोर जाण्यासाठी विशेष प्रयत्न केली गेली पाहिजे.
या संपुर्ण कार्यक्रमांचे खुमासदार पद्धतीने सुत्र संचालन छत्रपती संभाजी महाराज  जयंती महोत्सव समिती २०२३दिल्ली चे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी करून चपखल शब्दांचा वापर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
विजय काकडे,मराठा रामनारायण,कमलेश पाटील, इंजी.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील आदींनी समयोचीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासभाऊ पांगार कर होते.आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनपर भाषनात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहास कालीन अनेक पैलूंचा उलगडा करताना माँ जिजाउ साहेबाना चार भाउ असल्याचे नमुद करून जाधवराव कुटुंबातील पाहिलं पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरुन मिरवणुक काढून साखर वाटणारे पहिले आई बाबा ठरले तर  माँ जिजाउ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र - कोकण व दक्षिण भारत हे कार्य क्षेत्र कसे होते त्यावर विशेष भर देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलताना अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले की, आमच्या समितीची वाटचाल प्रगत पद्धतीने होत असुन राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनतर्फे सुध्दा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून छत्रपती संभाजी महाराज यांचा तळपता इतिहास देशातील प्रत्येक गावात पोहचला पाहिजे असेही ते म्हणाले.

विधिज्ञ मयुर पांगारकर,रविंद्र सोनवणे, योगेश केवारे,विक्की राज पाटील,मच्छीद्रनाथ पाटील, निखिल पांगारकर,गणेश लोखंडे, अरूण कदम, दिपक पाटील राजूरकर, इंजि.प्रविण जाधव, श्याम जाधव,प्रा.डॉ.मनिषा मराठे, सूवर्णा तुपे, माधव अवरगंड, राजीव थिटे, पुजा काकडे,विठ्ठल काकडे, योगेश देशमुख,कावेरी देशमुख, महादेव लामतुरे,श्रद्घा लामतुरे, स्वाती सुतार,अक्षय पाडुळे, सुनिल दिवसे,पायल काकडे, अक्षरा काकडे,गणेश तुपे यां सह राकेश सिंग रामसिंग, विधिज्ञ सुदर्शन कुटे,विधिज्ञ विजय खामकर,विधिज्ञ अमोल सुर्यवंशी,दिपक पाटील राजूरकर, विधीज्ञ अमोल करांडे,इंजि.प्रविण जाधव, सुमित मराठा, राममेहर मराठा , भूपेंद्र मराठा,जोगिंदर मराठा, प्रवीण भोसले, संजय बोदले, नरेंद्र मराठा, उमेश महावर
श्याम जाधव आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्राख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके यांचे छत्रपती संभाजी महाराज  जयंती महोत्सव समिती २०२३ दिल्लीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलताना प्राख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके यांनी अत्यंत मृदु व सरळ भाषेत छत्रपती संभाजी महाराज यांची जिवनी मांडताना छत्रपती संभाजी महाराज यांना नवव्या वर्षीच मिळालेली मनसबदारी, सोळाव्या वर्षी लिहलेले महत्वपुर्ण ग्रंथ आणि त्यातुन मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधुन प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असुन आठरा पगड जातींच्या मावळ्याना सोबत घेउन स्वराज्य रक्षणार्थ त्यांचे कार्य म्हणजे
" स्वराज्याचे रक्षक " हे ब्रीद त्यांचें साठीच असल्याची बाब स्पष्ट होत असुन वयाच्या ३२व्या वर्षा पर्यंत स्वराज्य रक्षणाचे त्यांचें  उत्तुंग कार्य नतमस्तक करायला लावणारे असुन स्वतःचे अतिउच्च ध्येय असल्या शिवाय प्रगती नाही म्हणून हातात शस्त्र घेणाऱ्या समाजाच्या व शेतकऱ्यांच्या हातात फाशी घेण्यासाठी दिसणारी दोरी व आत्महत्या व्यथित करतात असे मोठया धीर गंभीर भाषेत नमुद करतांना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.
मन हेलावून सोडणाऱ्या या व्याख्यानाचा समारोप आणि उपस्थितांचे आभार समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रामबाग मैदान वाचवले  नागरिकांच्या आवाजाला मिळाले यश :आ.किशोरभाऊ जोरगेवार रामबाग मैदान वाचवले नागरिकांच्या आवाजाला मिळाले यश :आ.किशोरभाऊ जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : चंद्रपूरच्या रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. याला चंद्रपुरातील नागरिकांनी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन..!
जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
पत्रकारीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर गंगासागरे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा  
देगलूर तालुक्यातील  तमलूरचा सचिन वनंजे  शूर पुत्र देशासाठी शहीद