पत्रकाराला शिविगाळ;सरपंच पती देवचंद पवार,अमोल बहाळे यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पत्रकाराला शिविगाळ;सरपंच पती देवचंद पवार,अमोल बहाळे यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

आधुनिक केसरी न्यूज 
जळगाव जा : आधुनिक केसरी वृत्तपत्राचे बुलढाणा जिल्हा प्रतीनीधी सागर झनके यांना अमोल बहाळे व सरपंच पती देवचंद पवार यांनी २९ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी येवून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की,पत्रकार सागर झनके हे जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार असून  ते आपल्या लिखाणातून सातत्याने विविध विषयावर लिखाण करत जणतेच्या प्रश्नांना वाचा फोडत असतात.दादुलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गौलखेड येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून असलेल्या सरकारी जागेवर गावातील राजेश रणीत या  व्यक्तीने अवैधपणे शौचालयाचे बांधकाम केले होते.त्या संदर्भात पत्रकार सागर झनके यांनी त्याची तक्रार करत ग्रामपंचायत प्रशासनाला कार्यवाही करण्यास भाग पाडले,तसेच ग्रामपंचायत अंतर्गत  दलित वस्तीमध्ये होत असलेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचारा बाबत सातत्याने प्रसारमाध्यमामध्ये बातम्या दिल्या आहेत.याच सुड भावणेतून सरपंच पती देवचद रामभाऊ पवार आणि उपसरपंच असलेल्या जिजाबाई बहाळे या  महिलीचा मुलगा अमोल बहाळे हे   दोघेही २९ मार्च रोजी सागर झनके यांच्या घरी दारू पिवून येवून तुझ्या घराचे समोर पडलेले  बांधकामाचे मटेरियल तात्काळ उचल नाही तर आम्ही आमच्या जेसीपी ने रोडच्या बाजूला फेकून देवू,अशा शब्दांत धक्का बुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.वास्तविक हे दोघेही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस्य नाहीत तरिही त्यांनी दादागीरी करत पत्रकार सागर झनके यांना शिविगाळ करत लोटपाट केली.याबाबतची लेखी तक्रार सागर झनके यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोदला २९ मार्च रोजी दिली असून त्यांचेवर भा.द.वी कलम २९४,३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   महाराष्ट्र सातत्याने पत्रकारांना धमकावण्याच्या,शिविगाळ करण्याच्या,वाहणाने उडून देवून जीवे मारण्याच्या घटणा घडत आहेत.त्यामुळे पत्रकार बांधवामध्ये कमालिची अस्वस्थता दिसून येत आहे. अशा या घातक प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच कार्यवाही केली नाही तर लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकांना नंक्कीच जिवाने मुकावे लागणार ऐवढ मात्र खरे.
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

५ किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढत चंद्रपूरकरांनी केला भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम ५ किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढत चंद्रपूरकरांनी केला भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी "नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक" या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर...
कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप