भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण : वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक, डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी
आधुनिक केसरी न्यूज
पुणे : महाराष्ट्रातील बहुचर्चित भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक, डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. याबाबतची नोटीस भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना बजावली आहे. २१ ते २५ जानेवारी दरम्यान या पोलिस अधिका-यांची चौकशी करून त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे, असे या नोटीसीत म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावमध्ये त्या दिवशी नेमके काय घडले, याबाबत पोलिस अधिका-यांचे म्हणणे काय हे या चौकशीत जाणून घेतले जाणार आहे. भीमा-कोरेगाव प्रकरण घडले तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक व सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते.
तसेच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार यांचीही आयोगासमोर चौकशी होणार असून हर्षाली पोतदार या भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आहेत. २१ ते २५ जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची २१ ते २२ जानेवारी, डॉ. शिवाजी पवार यांची २१ ते २३ जानेवारी तर विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची २४ ते २५ जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.या प्रकरणामुळे पोलिस वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List