श्री गंगागिरी महाराज यांच्या समाधी दर्शनाने एक धामाचे पुण्य : महंत रामगिरीजी महाराज

श्रीक्षेत्र गोदावरीधामात गंगागिरीजी महाराज पुण्यतिथी व महायज्ञाची सांगता

श्री गंगागिरी महाराज यांच्या समाधी दर्शनाने एक धामाचे पुण्य : महंत रामगिरीजी महाराज

 

आधुनिक केसरी न्यूज 

गुलाब वाघ 

गंगापूर  : ज्ञानोबारायाच्या कृष्णी वेधियली विरहीनी बोंले या गवळणीवरती विवेचन करतांना म्हणाले की, चारही बाजुने पवित्र अशा गोदावरी नदीच्या जलाशयाचे सुरक्षा कवच लाभलेल्या व गोदावरी नदीच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाचे नामकरण ‘श्री सद्गुरू गंगागिरी महाराज गोदाधाम’ करण्यात आल्याची घोषणा मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केली. श्री गंगागिरी महाराज यांच्या समाधी दर्शन आणि एक धामाचे पुण्य भाविकांना मिळेल असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी हरिहर महा यज्ञाच्या सांगता काल्याच्या कीर्तनप्रसंगी केले.

योगिराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज मंदिर जिर्णोद्धारपूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्री हरिहर महायज्ञ पुर्णाहूती सोहळ्या सप्पन्न झाला.

यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले की, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू हरीगिरीजी महाराज, सद्गुरू नाथगिरीजी महाराज, सद्गुरू सोमेक्षरगिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या पाचही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा श्री क्षेत्र सराला बेटावरील भूमिमध्ये प्रेरणादायी ऊर्जा निर्माण झालेली आहे. अशा गोदावरीच्या पवित्र उदरात आपण आहोत.

गोदावरीच्या गोदीत आपण आहोत. गोदावरी मातेने आपल्याला उदरात घेतले आहे. आईच्या गोदीमध्ये जो कोणी असतो, त्याला कधी काहीही कमी पडत नाही. त्यामुळे हे सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान ‘श्रीक्षेत्र सराला बेट’ या नावाने असलेल्या तीर्थक्षेत्राचे ‘श्री हरिहर महायागा’च्या निमित्ताने ‘गोदाधाम’ असे नामकरण करीत आहोत. ही संकल्पना गुरूवर्य विश्वनाथगिरीजी महाराज यांनी अकरा वर्षापूर्वी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी गोदावरीच्या उदरामध्ये असलेल्या या तीर्थस्थळाला ‘गोदा धाम’ असे नामकरण करा, असे सांगितले होते. त्यांच्या आदेशानुसार ‘गोदाधाम’ असे नामकरण करीत आहोत, असे महंत रामगिरीजी महाराज यांनी जाहीर केले.


महंत रामगिरीजींच्या निवडीचा सार्थ अभिमान !
येथील पवित्र अशा धार्मिक क्षेत्राचे पाच पिढ्यांपासूनची परंपरा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या पश्चात कुणाकडे सुपूर्त करायची याबाबत मोठा खल झाला. परंतु आम्ही सर्वांनी या परिसरात फिरून लाखो भाविक भक्तांच्या भावनांचा कानोसा घेतला. तसेच सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या इच्छेप्रमाणे श्रीक्षेत्र सराला बेटाच्या मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांची निवड केली होती. या त्यागी ब्रह्मचारी योग्याने ही जबाबदारी नेटाने पेलतांना या तीर्थक्षेत्राचा पूर्णपणे कायापालट करून सर्व समाजाला एकत्रित केले. त्यांच्या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे आखाडाचे परमश्रद्धेय कृष्णागिरीजी महाराज यांनी सांगितले.

श्री हरिहर महायज्ञासाठी दोन हजार ‘यजमान’
श्रीक्षेत्र सराला बेट येथे सन 2014 मध्ये भव्य असा रूद्रयाग सोहळा झाला होता. त्यानंतरच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आयोजित मंदिर जिर्णोद्धार, विविध देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्री हरिहर महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी अहमदनगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील म्हणजे 2000 यजमानांनी सहभाग घेतला होता. तसेच 301 वेदशास्त्र पंडितांच्या तीन दिवसीय मंत्रोच्चारात सर्व परिसर भक्तीमय वातावरणाने पवित्र झाला. यावेळी पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर आखाड्यांचे महंत श्री कुष्णगिरी महाराज वैजापूरचे आमदार प्रा रमेश पा बोरणारे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर माजी आमदार स्नेहलता कोल्हे शिक्षण आरोग्य सभापती अविनाश गंलाडे माजी बांधकाम सभापती संतोष पा जाधव उपनगराध्यक्ष साबेरभाई शेख बाळासाहेब कापसे बाबासाहेब जगताप भाऊसाहेब झिंजुर्डे  हर्षवर्धन कराड कुष्णा पा डोणगावकर संतोष पा माने वाल्मीक सिरसाठ बाबासाहेब चिडे अनिल वाणी भाऊलाल सोमासे दत्तु पा खपके सचिन जगताप राजेश्वरगिरी महाराज हरिशणगिरी महाराज सदिपान महाराज सरला बेटांचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह संत महंत व लाखों भाविकांच्या उपस्थितीत  महाप्रसादाने पुण्यतिथी महायज्ञ सोहळ्याची सांगता झाली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे
आधुनिक केसरी न्यूज मुंबई, दि.४ - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव...
शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक ; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना 
कारकीन गावात कृषी दुतांकडून कृषी दिन उत्साहात साजरा..!
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तुळाणा येथे पोहचली बस ; गावकऱ्यांनी केले बसचे स्वागत
वरोरा पंचायत समितीच्या प्रवेश दाराला नागरिकांने ठोकले कुलूप..!