Video : माळेगाव - बंगडापुर रस्त्यावर वाघाचे दर्शन ; ग्रामस्थांमध्ये दहशत

हजारो गावकरी उतरले रस्त्यावर ; चक्का जॅम करीत महामार्ग रोखून धरला

Video : माळेगाव - बंगडापुर रस्त्यावर वाघाचे दर्शन ; ग्रामस्थांमध्ये दहशत

आधुनिक केसरी न्यूज 

वर्धा : माळेगाव ते बंगडापुर रस्त्यावर वाघ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.एकीकडे नागपूर - अमरावती महामार्ग तर दुसरीकडे जंगलव्याप्त गावे आहेत. गावकऱ्यांना जंगलात गेल्याशिवाय शेती करता येईना तर वन्य प्राण्यांना देखील गावाच्या शेजारी आल्याशिवाय भ्रमंती करता येईना अशीच परिस्थिती वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील गावांची झाली आहे.  सततच्या वाघाच्या हल्ल्यांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील गावकरी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले. चक्का जॅम करीत महामार्ग रोखून धरला. 

 अगदी दोन दिवसांपूर्वी बंगडापुर येथील 35 वर्षीय शेतकरी होरेश्वर घसाड (35) याच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली. शेतकऱ्याचा शेतात झालेला मृत्यू पाहून गावकाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. गावकऱ्यांनी वन विभागाला धारेवर धरले. चक्क वन कर्मचाऱ्याला झाडाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवशी वाघाने बंगडापुर गावाजवळ शेतकऱ्याचा बैल ठार केला. आणि गावकरी रस्त्यावर उतरले बांगडापूर रस्त्यावर रस्ता रोको करीत रस्ता अडविण्यात आला. लगेच दोन दिवसांनी गांधी जयंतीच्या दिवशी महामार्गावर हजारोच्या संख्येत चक्का जॅम करण्यात आला.

 परिसरात बांगडापूर येथे झालेला शेतकऱ्याचा मृत्यू हा 13 वा आहे. गेल्या दोन वर्षात कारंजा तालुक्यात 7,आष्टी तालुक्यात 5 ,आर्वी येथे अस्वलाच्या हल्ल्यात 1 व्यक्ती मृत्युमुखी झाला आहे. तर  399 च्या घरात आतापर्यत पशुधन गमावले आहे. बांगडापूर येथील शेतकरी घसाड याला दोन छोटी मुलं, पत्नी आणि आई आहे. मुलांनी बाप गमावला तर मित्रांनी आपला सहकारी गमावला. अशीच खंत गावात आहे. शेती पडीक राहू नये, शेतीचे जंगल होऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भीतीपोटी शेती करता येत नाही म्हणून शेती पडीक ठरते आहे. 

आमदार दादाराव केचे

  सरकारकडून 20 लाखाचा निधी दिला जातो, हा निधी तुटपुंज्या असून तो वाढवून 50 लाखाचा निधी देण्यात यावी अशी मागणी आहे. परिसरातील येनी दोडका, मेठहीरजी, मरकसुर,उमरविहिरी, गरमसुर या पाच गावाचा पुनर्वसन प्रश्न अद्यापही धूळखात असून त्याला मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तर दुसरीकडे वन विभागाने सतर्क होत वाघिणीचा शोध सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी