ठाकरे काॅंग्रेसचा सफाया, भाजपाला एकजागा जास्त- आ.बागडे

ग्रामपंचायत निवडणूक

ठाकरे काॅंग्रेसचा सफाया, भाजपाला एकजागा जास्त- आ.बागडे

 आधुनिक केसरी न्यूज

औरंगाबाद - संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे सेनेने घवघवीत यश मिळवत ठाकरेकाॅंग्रेसचा दारुण पराभव केला.अशी प्रतिक्रिया आ. हरिभाऊ बागडे यांनी आधुनिक केसरी न्यूज शी बोलतांना दिली.

आ.संजय शिरसाठ यांच्या मतदार संघातील काही ग्रामपंचायत होत्या.तर आ.सत्तार यांच्या मतदार संघातील काही ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांचा विजय झाल्याचे बागडे म्हणाले.

तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले की, मी आताच मुंबईहून आलो आहे. त्यामुळे माहिती घेऊन माध्यमांशी बोलणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने  ठाकरे सेनेला धूळ चारली आहे. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती पैकी तब्बल १२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला १५ पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये अस्तित्व टिकवता आलं. काँग्रेसला  एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला दोन ठिकाणी यश मिळाल्याचे आ. बागडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे.  त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाची केविलवाणी अवस्था झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपसोबत जात एकनाथ सिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण याचा फारसा उपयोग जिल्हा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी झाला नाही.यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत जनतेशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे राज्यभर शिवसेनेच्या बाजूने वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीतून शिंदे गटाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. 

औरंगाबाद

1 : वडगाव कोल्हाटी १७ जागा शिंदे गट

 ११ जागेवर(संजय शिरसाठ, शिंदे गट )

४ शिवसेना

२ भाजप 

 

 

 सिल्लोड

१ उपळी सत्तार(शिंदे गट )

२ नानेगाव सत्तार(शिंदे गट )

३ जांभळा सत्तार(शिंदे गट )

 

 

गंगापूर

१अगरकानडगव- भाजप 

२ ममदापूर - शिवसेना ठाकरे गट

 

 

वैजापूर

१ पणवी खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट 

२ लाख खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट 

 

 

पैठण

१ खादगाव राष्ट्रवादी

२खेरडा   भुमरे शिंदे गट

३ नानेगाव  भुमरे शिंदे गट

४ आपेगाव भुमरे  शिंदे गट

५ अगर नांदूर   भूमरे सशिंदे गट

६ शेवता  भुमरे शिंदे गट

७ तांडा बूदृक भुमरे शिंदे गट

 

 

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : दुकानातील चॉकलेट मागण्याचा बहाणा करत व  महिलेला बोलण्यात गुंतवत अज्ञात दोन चोरट्यानी रुक्मिणी मारुती राऊत...
स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?: हर्षवर्धन सपकाळ.
कॅनॉल मध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण
रक्षाबंधनानिमित्त एसटीला तब्बल १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न परिवहन मंत्र्यांनी केले एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 
संत नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज शेगाव रेल्वे स्थानक परिसरात फडकला
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे गुरुवारी परभणी दौर्‍यावर
संत चोखासागराचे तीन वक्रद्वार  उघडले  २८.३४ दलघमी विसर्ग,१९ गावांना सतर्कतेचा इशारा